एक्स्प्लोर

Beed Crime: बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका

Beed Crime news:मुलीचा एचआयव्हीने मृत्यू झाला अशी अफवा पसरल्याने पीडित कुटुंबासोबत गावकऱ्यांनी दैनंदिन थांबवले आहेत. या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे.

बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात विवाहित मुलीला एआयव्हीची लागण झाल्याची अफवा पसरल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना सर्व गावकऱ्यांनी वाळीत टाकल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या तरुणीचा अलीकडेच मृत्यू झाला होता. बीड शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून या महिलेला एचआयव्ही झाल्याचे निदान करण्यात आले होते. मात्र, मुलीच्या वडिलांनी याप्रकरणात पोलीस आणि बीड शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस आणि डॉक्टरांच्या संगनमताने माझ्या मुलीला HIV झाल्याची अफवा गावात पसरवण्यात आली, असा आरोप मुलीचे वडील राजेंद्र जाधव यांनी केला आहे.

राजेंद्र जाधव यांची मुलगी श्रद्धा हिचे 2023 साली आष्टी तालुक्यातील बालाजी वडेकर यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, हुंड्यासाठी सासरी तिचा छळ सुरु होता. जावई बालाजी वडेकर, सासरे राजेंद्र वडेकर, दीर विशाल वडेकर , जाऊ वैशाली विशाल वाडेकर, नणंद भाग्यश्री विटकर आणि राजश्री पवार यांच्याकडून श्रद्धाचा दोन लाखांच्या हुंड्यासाठी छळ झाला. श्रद्धावर अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार करण्यात आले, तसेच तिला जबर मारहाण झाली. श्रद्धाला भिंतीवर ढकलण्यात आल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला होता. तिला अहमदनगरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, याठिकाणी तिच्यावर मोठे ऑपरेशन झाले. यानंतर श्रद्धाला आम्ही सासरी आणले. तेव्हा सासरच्यांनी आमच्या घरी येऊनही श्रद्धाला मारहाण केली, असे राजेंद्र जाधव यांनी जिल्हाधिकऱ्यांना लिहलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

मुलीच्या वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

श्रद्धाला करण्यात आलेल्या मारहाणीची आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. बीड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आला. पण पुढे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. साधा माझा जबाबदेखील घेण्यात आला नाही. तर बीड शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनीही आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. आष्टी पोलीस ठाण्याचे पी.आय व बीट अंमलदार काळे  आणि बीड शासकीय रुग्णालयातील डॉ. ढाकणे यांच्या मनमानी कारभारामुळे समाजात आमची बदनामनी झाली. काळे यांनी माझ्या मुलीचे प्रेत घरी घेऊन जात असताना गावातील लोकांना मुलीला HIV झाल्याचे सांगितले. तुम्ही तिच्याजवळ येऊ नका, असेही ते गावकऱ्यांना म्हणाले. यामुळे माझ्या मुलीच्या अंत्यविधीला गावातील कोणीही आले नाही. पोलीस याप्रकरणात अजूनही आमचा जबाब नोंदवून घेत नाही, ते आरोपींना मदत करत आहेत. या सगळ्यामुळे माझी पत्नी आणि मुलांनी धसका घेतला आहे. माझी दोन्ही मुलं आईपासून दूर राहत आहेत, तिच्या हातचे जेवतही नाहीत. या सगळ्याचा मानसिक धक्का बसल्याने माझ्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

आणखी वाचा

बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 January 2024Sanjay Raut Full PC : ...तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं मोठं वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , योजनेचा अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Embed widget