City 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 29 May 2024
१ आणि २ जूनला मध्य रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक, १० आणि ११ नंबर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी जंबो ब्लॉक घेण्यात येणार, त्यानंतर १६ किंवा त्यापेक्षा अधिक डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबवता येतील, रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती.
उद्यापासून मध्य रेल्वेवरील प्रवास टाळलेलाच बरा. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे शुक्रवारी १८७ तर शनिवारी ५३५ लोकल रद्द.
ब्लॉकदरम्यान शक्य़ असल्यास वर्क फ्रॉम होम किंवा सुट्टी द्यावी. रेल्वेचं सरकारी आणि खासगी संस्थांना आवाहन.
पालघर रेल्वे स्थानकावरील रुळावर घसरलेले मालगाडीचे डबे बाजूला करण्याचं काम पूर्ण. अप आणि डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू.
बोईसर-पालघर या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून या भागातून एसटी महामंडळाने सोडल्या बस, तर लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेसमधूनही प्रवाशांना प्रवास करण्याची सोय.
पालघर मालगाडी अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार, पश्चिम रेल्वेचे डीआरएम नीरज वर्मांची माहिती, संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्वरत होण्याचाही व्यक्त केला विश्वास.
विरार डहाणू लोकल सेवा सुरु पूर्ववत, तब्बल २५ तासांनी धावली पहिली लोकल, पालघरजवळ मालगाडीचे ८ डब्ब घसरल्याने कालपासून लोकलसेवा होती ठप्प.
ब्लड सँपल फेरफार प्रकरणात अजय तावरेवर कारवाई, वैद्यकशास्त्र विभागप्रमुखपदाचा चार्ज काढला, आरोपी अतुल घटकांबळेचंही निलंबन.