Harshwardhan Sapkal : काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांचा अजेंडा काय? हर्षवर्धन सपकाळ EXCLUSIVE
Harshwardhan Sapkal : काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांचा अजेंडा काय? हर्षवर्धन सपकाळ EXCLUSIVE
Harshwardhan Vasantrao Sapkal : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागलाय. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल झालेत. नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. हायकमांडने देखील नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर केला असून नव्या प्रदेशाध्यक्षाची नेमणूक केलीये. विशेष म्हणजे काँग्रेसने कोणत्या साखर सम्राट, शिक्षण सम्राटाला किंवा प्रस्थापित नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी न देता तळागाळातून पुढे आलेल्या हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांना संधी दिलीये. त्यामुळे भाजपने काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना हँडल करण्यासाठी सातत्याने वापरलेलं हत्यार आता निष्प्रभ होणार आहे. कारण काँग्रेसने आता साध्यासुध्या चेहऱ्याला सिंहासनावर बसवलंय.
विशेष म्हणजे काँग्रेस समोर आमदार अमित देशमुख, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सारखे अनेक पर्याय होते. मात्र, काँग्रेसने सर्व प्रस्थापित नेते बाजूला करुन हर्षवर्धन सपकाळ यांना संधी दिलीये. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्रात मोठे बदल केले आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपद मिळालेलं असलं तरी हर्षवर्धन सपकाळ यांच्यापुढे मोठी आव्हानं असणार आहेत. महायुतीकडे विधानसभेत मोठं संख्याबळ आहे. शिवाय पक्षांतर्गत राजकारणाला देखील त्यांना सामोरं जाव लागू शकतं.
महत्त्वाच्या बातम्या























