City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 10 डिसेंबर 2024 : 08 AM ABP Majha
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, काल रात्री झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू.
कुर्ल्यातील अपघातग्रस्त बेस्ट बस चालकाने मद्यपान केलेलं नाही, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांच्याकडून स्पष्ट, पोलिसांच्या अहवालातही मद्यपानाचा उल्लेख नसल्याचा महाव्यवस्थापकांचा दावा.
बेस्ट बस अपघातप्रकरणातील आरोपी बसचालक संजय मोरे कोणतीही नशा करत नाहीत, त्यांच्या पत्नीचा दावा, तर वडिल ३५ वर्षांपासून गाडी चालवतायत, मात्र कोणताही अपघात झाला नसल्याची त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया.
कु्र्ला अपघातातील चालक संजय मोरे अवघ्या १० दिवसांपासून चालवत होते इलेक्ट्रिक बस, तपासात उघड, अनुभव नसताना इलेक्ट्रिक बस चालवायला देणारे अधिकारी कोण असा सवाल उपस्थित.
कुर्ला अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टनं करावा, मुख्यमंत्री फडणवीसांचा आदेश.
कुर्ल्यात झालेल्या बस अपघाताची चौकशी आणि तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून समितीची स्थापना, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये जाहीर.
कुर्ला अपघात प्रकरणात जखमी झालेल्या नागरिकांची काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली भेट, आमदार ज्योती गायकवाड, अमीन पटेल आणि माजी मंत्री अस्लम शेख भाभा रुग्णालयात जखमींच्या भेटीला.
बेस्ट बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत द्या, काँग्रेस आमदार अस्लम शेख यांची मागणी, तर महापालिका प्रशासन आणि बेस्ट प्रशासनावर शेख यांची टीका.