City 60 Super Fast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा : 07 June 2024 : ABP Majha
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून मनसेची माघार, कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसे अर्ज भरणार नाहीत., निरंजन डावखरेंचा मार्ग मोकळा.
भाजपच्यावतीने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे रिंगणात, आज कोकण भवन येथे अर्ज भरणार.
कोकण पदवीधर मतदार संघात काँग्रेस उमेदवारी दिला असताना आता उद्धव ठाकरे उमेदवार देणार, ठाकरेंकडून उमेदवार किशोर जैन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार.
मुंबई शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव नलावडे कोकण भवनमध्ये अर्ज भरणार, राज्यातील दोन मंत्री उपस्थित राहणार.
पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी २३ अर्ज दाखल, विधान परिषदेच्या कोकण, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस.
प्रफुल पटेलांसारखा न्याय सर्वांना द्यावा, संजय राऊतांची मागणी, माझी संपत्ती जप्त केली म्हणून मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही, संजय राऊतांची प्रफुल पटेलांवर टीका.