Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 5 PM : 13 डिसेंबर 2024 : ABP Majha
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी १५ तारखेला नागपुरात होण्याची शक्यता, १६ तारखेपासून विधीमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे १५ तारखेला शपथविधी होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती.
शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार, ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती.
अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती, याआधी अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त होत्या, तसंच त्या मेट्रो 3 चा कार्यभार सांभाळत होत्या.
बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार, इस्कॉन मंदिर जाळलं, प्रमुखाला अटक तरी आपण गप्प, यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांपुरतं आहे का?, उद्धव ठाकरेंचा घणाघात.
युक्रेनच्या युद्धाप्रमाणे बांगलादेशवरही लक्ष द्या, मणिपूरप्रमाणे बांगलादेशही मोदींना दिसत नाही, उद्धव ठाकरेंचा मोदींर निशाणा.
ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतायत, ठाकरेंचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे बघितलं, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात.
देशातल्या आणि मुंबईतल्या घडामोडींवर ठाकरे भाष्य करतील असं वाटलं होतं, लोकसभेत मुस्लीम धार्जिण भुमिकेचा त्यांना फायदा झाला पण विधानसभेत झाला नाही, म्हणून भुमिका बदलतायत असं दिसतं, संजय शिरसाटांची टीका.
उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्व खुंटीवर टांगणारे, भाजप नेत्या नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल.
डोक्यावर मुसलमानांची टोपी घातलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोलू नये, मशीदीतून फतवे काढून मतांची भीक मागणाऱ्या ठाकरे गटानं बांगलादेशातील हिंदूंवर बोलावं हे लज्जास्पद, भाजप आमदार प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका.
All Shows

































