Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट करावा एका क्लिकवर : 13 May 2025 : 12 PM : ABP Majha
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील एकूण ५१ जण मारले गेले, पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा, भारतीय कारवाईत ११ सैनिक मारले गेल्याची पाकिस्तानची कबुली.
जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सूत्रांनी माहिती,केल्लर इथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक,सुरक्षा दलाने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरलं होतं. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं समजतं.
नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची महत्त्वपूर्ण बैठक, सीडीएस आणि तीनही दलांच्या प्रमुखांसह बैठक, ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानवरील कारवाईचा सीडीएस अनिल चौहान यांनी संरक्षणमंत्र्यांना दिली विस्तृत माहिती
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध,काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले,दहशतवाद्यांना पकडण्यासाठी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर.
भारताने पाकिस्तानला वठणीवर आणले,जगाला भारताची ताकद आणि संयम दाखवून दिला, मोदींच्या भूमिकेवर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया.
देशात किंवा राज्यात लवकरच बॉम्बस्फोट होणार असा धमकीचा मेल, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना माहिती, दोन दिवसांत मोठा बाॅम्ब स्फोट होणार असा मेल मध्ये उल्लेख.
पुण्यातील खाजगी रुगणालयात बाॅम्ब ठेवल्याचा कंट्रोल रुमला फोन,मात्र याची चौकशी केल्यानंतर हा फेक काॅल असल्याची माहिती.
ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार, आजपासून २३ मे पर्यंत देशभरात तिरंगा यात्रा काढली जाणार, यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार.
जम्मू-का्मीरमधील सीमा भागाबाहेरच्या सर्व शाळा आजपासून सुरू, दोडा, किश्तवाड, रियासी आणि रामबन जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळ आजपासून सुरु.
All Shows

































