नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ दिली. पौडेल यांनी नेपाळच्या तिन्ही प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुखांना बोलावून प्रतिनिधी सभा बरखास्त केली.

काठमांडू: नेपाळमधील (Nepal) Gen-Z आंदोलनानंतर तेथील राजकीय स्थित्यंतरे बदलली असून सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील बंदी निमित्त ठरल्यानंतर झालेल्या आंदोलनात (Agitaion) आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, नेपाळचे माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पळ काढला होता. त्यानंतर, नेपाळच्या पंतप्रधानपदावर कोण विराजमान होणार याची चर्चा जगभरात होती. आता, नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदासाठी (Prime minister) सुशीला कार्की यांची निवड करण्यात आली आहे. नेपाळमधील जेन झी आंदोलनाचे नेते बालेन शाहा यांचे नाव पंतप्रधानपदासाठी आघाडीवर होते, पण सुशीला कार्की यांची वर्णी लावली आहे.
नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सुशीला कार्की यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. पौडेल यांनी नेपाळच्या तिन्ही प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुखांना बोलावून प्रतिनिधी सभा बरखास्त करत असल्याचे सांगितले. तसेच, सुशीला कार्की ह्या अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतील, अशी घोषणाही त्यांनी केली होती. त्यानुसार, सुशीला कार्की यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून राष्ट्रपतीकडून त्यांचा शपथविधी संपन्न होत आहे. सुशीला कार्की ह्या माजी सरन्यायाधीश असून देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. नेपाळच्या पंतप्रधानपदासाठी दिवसभर झालेल्या प्रतिनिधी सभेतून अखेर सुशीला कार्की यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाल्यानंतर नेपाळच्या नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा झाली. अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आंदोलकांच्या मागण्यांची पूर्तता करत त्या पुन्हा निवडणुकांसाठी सज्ज होतील. त्यानंतर, नेपाळमध्ये निवडणुका होऊन नव्याने सरकार स्थापन होईल.
नेपाळमध्ये हिंसाचार, पंतप्रधानांचा राजीनामा (Nepal agitation)
नेपाळचे माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या सरकारविरुद्ध जनतेमध्ये तीव्र असंतोष होता. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरले असतानाच, सोशल मीडियावरील बंदी सरकार उलथवण्यासाठी कारणीभूत ठरली. येथील संतापजनक आंदोलनादरम्यान अनेक शहरांत हिंसाचार झाला. संसद भवन, नेत्यांची निवासस्थाने आणि सरकारी कार्यालयांवर आंदोलकांनी तोडफोड केली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही युवकांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. त्यामुळे ओलींवर सतत दबाव वाढत होता. याआधीच गृहमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी राजीनामा सादर केला होता. अखेर ओलींनाही सत्ता सोडावी लागली. त्यामुळे, नेपाळचे नवे पंतप्रधान कोण अशी चर्चा सुरू झाली. त्यावेळी, बालेन शाह, कुलमान घिसिंग यांचीही नावे समोर आली होती. मात्र, सुशीला कार्की यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
Nepal's former Chief Justice, Sushila Karki, to take oath as interim PM today
— ANI Digital (@ani_digital) September 12, 2025
Read @ANI Story | https://t.co/S2eEms2d6w#Nepal #SushilaKarki #GenzProtest pic.twitter.com/mFQqTqEqWX
हेही वाचा
मोठी बातमी! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार; शासन आदेश जारी
























