VIDEO : जगातील पहिलं डोकं प्रत्यारोपण करणार रोबोट? एका व्यक्तीचं डोकं दुसऱ्याच्या शरीरावर बसवलं जाईल, कसं ते पाहा
Worlds First Head Transplant With Robotic Surgeons : वाढत्या तंत्रज्ञानामुळे सध्या अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. अेक रोबोट शस्रक्रियेतही वापरले जातात.
मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञानत दिवसेंदिवस झपाट्याने प्रगती करत आहेत. यामध्ये रोबोटचा शोध अतिशय क्रांतिकारी मानला जातो. रोबोट सर्वात मोठी आणि अवघड कामेही कमी वेळात अगदी सहजपणे पूर्ण करतो. रोबोट्समुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, यात काही शंका नाही. पण, त्यामुळे मेडिकल फिल्डमध्येही फार सुधारणा झाल्या आहेत. अलीकडेच, अमेरिकेतील न्यूरोसायन्स आणि बायोमेडिकल अभियांत्रिकी स्टार्टअप ब्रेनब्रिजने दावा केला आहे की, ते जगातील पहिली डोकं प्रत्यारोपण प्रणाली विकसित करत आहेत.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, एक अशी प्रणाली विकसित केली जात आहे, ज्याच्याद्वारे रोबोट थेट एका व्यक्तीचं धड दुसऱ्या व्यक्तीवर प्रत्योरोपण करु शकतील. ब्रेनब्रिज कंपनीच्या वेबसाइटनुसार, हे उपकरण न्यूरोसायन्स, मानवी अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करेल. या डोकं प्रत्यारोपणाच्या रोबोटिक शस्त्रक्रियेचा एक व्हिडीओही सध्या समोर आला आहे.
कशाप्रकारे होणार मेंदू प्रत्यारोपण शस्त्रक्रिया?
ब्रेनब्रिज रोबोटच्या सहाय्याने डोके प्रत्यारोपण कशाप्रकारे करण्यात येईल, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ॲनिमेटेड व्हिडीओमध्ये दोन सर्जिकल रोबोट एकाच वेळी दोन शरीरांवर काम करताना दिसत आहेत. रोबो एका शरीरातून डोके काढून आणि दुसऱ्या शरीरावर त्याचं प्रत्योरोपण करताना दिसत आहेत. हे तंत्रज्ञान तयार झाल्यास रोबोट शरीरावर कसे कार्य करतील हे ॲनिमेशन पुढे दाखवण्यात. ब्रेनब्रिजच्या मते, हे तंत्रज्ञान डोकं प्रत्यारोपण करण्याच्या तंत्रासाठी एक क्रांतिकारी संकल्पना आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात यशस्वी डोकं आणि चेहरा प्रत्यारोपण केलं जाऊन त्याचे चांगले परिणाम आणि जलद परिणाम पाहायला मिळतील.
पाहा रोबोटिक सर्जनचा व्हिडीओ
🤖 BrainBridge, the first head transplant system, uses robotics and AI for head and face transplants, offering hope to those with severe conditions like stage-4 cancer and neurodegenerative diseases… pic.twitter.com/7qBYtdlVOo
— Tansu Yegen (@TansuYegen) May 21, 2024
व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
रोबोटिक शस्त्रक्रियेच्या या व्हिडीओवर एका युजरने लिहिले आहे की, आजपर्यंत अशी कोणतीही शस्त्रक्रिया किंवा थेरपी झालेली नाही, ज्यामध्ये एकटा व्यक्ती तुटलेला पाठीचा कणा पुन्हा जोडला जाऊ शकेल, मग एका व्यक्तीचं डोकं दुसऱ्याला बसवण्याचा विषय तर लांबच राहिला. दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, हे रोबोट आहेत आणि माणूस नाहीत, जे न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, ट्रेकोस्टोमी, व्हॅस्कुलर सर्जरी, ऍनेस्थेसिया करु शकतील. यासाठी माणसाची कमांडही आवश्यक आहे. यापैकी कोणतीही गोष्ट स्वतः करू शकेल असा कोणताही रोबोट आतापर्यंत तयार झालेला नाही, त्यामुळे याचा विचारच सोडून द्या. जे आजपर्यंत कोणत्याही मानवाला जमलं नाही, ते रोबोटला खरंच शक्य होईल का? अशाप्रकारचे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.