एक्स्प्लोर

WhatsApp: WhatsApp आणणार Google Meet सारखं भन्नाट फिचर, एकाच वेळी 32 लोकांसोबत करता येणार व्हिडीओ कॉल

WhatsApp Update: सध्या व्हॉट्सअॅप यूजर्सना 8 लोकांसोबत व्हिडीओ कॉल आणि 32 लोकांसोबत ऑडिओ कॉलिंग करण्याची सुविधा मिळते. ही सर्व सुविधा विंडो सिस्टीमवर उपलब्ध आहे. यामध्ये लवकरच बदल करण्यात येणार आहे.

WhatsApp Update : सर्वाधिक लोकप्रिय मॅसेंजर अॅप म्हणून व्हॉट्सअॅपची ओळख आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन अपडेट्स आणत असते. यामुळे अॅप यूजरफ्रेंडली राहण्यास मदत मिळते. जर तु्म्ही व्हॉट्सअॅपचा कम्प्युटरवर वापर करत असाल, तर तुम्हाला हे माहिती आहे की व्हॉट्सअॅपचे काही फिचर्स विंडोजवर अजूनही उपलब्ध नाहीत. अर्थात कंपनी हे फिचर्स अँड्रॉईड मोबाईलमध्ये उपलब्ध करून देते. परंतु विंडोज व्हर्जनमध्ये देत नाही. आता कंपनीकडून ही कमतरताही दूर केली जाणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅप अनेक भन्नाट फिचर्स विंडो व्हर्जनमध्ये उपलब्ध करून देणार आहे. यापूर्वी मेटाकडून युजर्सना विंडो व्हर्जनमध्ये फोटो एडिटींग आणि स्टिकर सजेशनचा पर्याय दिला होता. आता व्हॉट्सअॅप आणखीन नवीन फिचर विंडो व्हर्जनमध्ये (WhatsApp Video call feature for windows) देणार आहे. जे आधीपासून तुमच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. या नवीन भन्नाट विंडो व्हर्जनच्या फिचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया...

काय आहे अपडेट

व्हॉट्सअॅपच्या बदलांवर लक्ष देणाऱ्या Wabetainfo वेबसाईटनुसार,  आता लोकप्रिय मॅसेंजर अॅप व्हॉट्सअॅपही विंडोजच्या अॅपवर स्मार्टफोनसारखं 32 लोकांना व्हिडीओ कॉलिंग करण्याची सुविधा उपलब्ध देणार आहे. सध्या हे फिचर प्राथमिक स्तरावर आहे. मात्र काही बीटा यूजर्सना टेस्टिंगसाठी उपलब्ध करून दिलं आहे. आता येत्या काळात सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या तुम्ही व्हॉट्सअॅप विंडो अॅपच्याद्वारे एकाच वेळी 32 लोकांना ऑडिओ कॉल आणि 8 लोकांसोबत व्हिडीओ कॉलिंग करू शकता. आता नवीन अपडेटचा सपोर्ट मिळाल्यानंतर व्हॉट्सअ्ॅप युजर्स एकाच वेळी 32 लोकांसोबत व्हिडीओ कॉलिंगसाठी जोडले जाऊ शकतात. यामुळे छोट्या मीटिंग्स सहज पार पाडल्या जाऊ शकतात.  यामुळे गुगल मीटिंगचा वापर कमी होईल आणि व्हॉट्सअॅप विडों व्हर्जनचा वापर केला जाईल. 

लवकरच विंडो व्हर्जनमध्ये मिळणार हे भन्नाट फिचर

सध्या व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर (WhatsApp Update) आणण्याच्या तयारीत आहे. हे फिचर View Once या नावाचं असून विंडो अॅपमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे. हे फिचर अँड्रॉईड युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनचं उपलब्ध आहे. या फिचरच्या मदतीनं  कम्प्युटर आणि लॅपटॉपवरही तुमच्या फोटो आणि व्हिडीओजला सेट करता येणार आहे. यासोबत अलीकडेच कंपनीनं या विंडोज अॅपमध्ये In App Chat Suport नावाच फिचरही जोडलं आहे. यामुळे यूजर्सना व्हाट्सअॅप चॅटद्वारे कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करता येईल. या चर्चेच्या माध्यमातून आपले प्रश्न आणि तक्रारी मांडता येणार आहेत. युजर्स ई-मेलच्या माध्यमातूनही तक्रार करून माहिती मिळवू शकणार आहेत. यामुळे हे नवीन विंडो व्हर्जन भन्नाट फिचर असून अनेक युजर्सना पसंत पडू शकतं. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

WhatsApp Update : व्हॉट्सअॅप आणणार भन्नाट फीचर, कंटेट क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरणार; जाणून घ्या कसं असेल नवीन फीचर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget