(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Whatsapp New Update : Whatsapp चं नवीन 'चॅनेल फीचर' सादर; 'असा' वापर करू शकाल
Whatsapp New Update : व्हॉट्सअॅपने भारतासह 150 हून अधिक देशांमध्ये चॅनल फीचर लाईव्ह केलं आहे.
Whatsapp New Update : लोकप्रिय मॅसेजिंग शेअरिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी नेहमीच अपडेटेड फिचर्स घेऊन येतं. आतादेखील Meta ने व्हॉट्सअॅपचे एक नवीन फिचर लाँच केलं आहे. व्हॉट्सअॅपने भारतासह 150 हून अधिक देशांमध्ये चॅनल फीचर लाईव्ह केलं आहे. हे फीचर इंस्टाग्रामवरील ब्रॉडकास्ट चॅनलप्रमाणेच काम करणार आहे. कंपनी टप्प्याटप्प्याने हे अपडेट सादर करत आहे. ग्राहकांना येत्या काळात हे फीचर उपलब्ध होईल. कंपनी 'अपडेट्स' टॅब अंतर्गत नवीन फीचर अपडेट करेल जिथून तुम्हाला स्टेटस अपडेट्स आणि चॅनेल दिसतील. जे लोक प्रसिद्ध आहेत तसेच जे सोशल मीडियावर कंटेंट तयार करतात अशा लोकांसाठी चॅनेल फीचर हे फायदेशीर ठरणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फॉलोअर्सशी कनेक्ट होऊ शकता.
चॅनेलचे वैशिष्ट्य काय आहे?
व्हॉट्सअॅपचे चॅनल फीचर आधीपासून उपलब्ध असलेल्या ग्रूप आणि कम्युनिटी वैशिष्ट्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने हे फिचर तयार केले आहे. WhatsApp च्या इतर वैशिष्ट्यांप्रमाणे, चॅनेल वैशिष्ट्य एंड-टू-एंड एनक्रिप्टेड नाही. चॅनेल तयार केल्यावर, कंपनी एडमिनला अनेक प्रकारचे अधिकार देते जे एडमिन त्याच्या चॅनेलमध्ये लागू करू शकतात. जसे की त्यात कोण सामील होऊ शकते, कंटेंट फॉरवर्ड करणे इ.
हे कसं काम करतं?
चॅनल फीचर इंस्टाग्रामच्या चॅनेल फीचर प्रमाणेच कार्य करते ज्यामध्ये एडमिन त्यांच्या फॉलोअर्ससाठी फोटो, व्हिडीओ, इमोजी, व्हॉइस-नोट्स इत्यादी पोस्ट करू शकतात. चॅनेलमध्ये एॅड होण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ते शोधावे लागेल. चॅनेलमधील अॅडमिन आणि फॉलोअर्सचे डिटेल्स एकमेकांना दिसत नाहीत आणि लोक त्याद्वारे त्यांच्या आवडत्या क्रिएटर किंवा व्यक्तीशी सहजपणे कनेक्ट होऊ शकतात.
सध्या चॅनल फीचर नवीन आहे. कंपनी आगामी काळात अनेक अपडेट्स आणणार आहे. एडमिन लवकरच त्यांच्या चॅनेलमधील पोस्ट 30 दिवसांच्या आत पोस्ट करू शकतील. यानंतर ते व्हॉट्सअॅप सर्व्हरवरून हटवले जाईल. याशिवाय, जर अॅडमिनने चॅनलची कोणतीही पोस्ट ग्रुप किंवा चॅटमध्ये शेअर केली, तर समोरच्या व्यक्तीला चॅनलमध्ये सामील होण्याचा पर्याय (लिंक बॅक) मिळेल. याद्वारे यूजरला त्या विषयाची अधिक माहिती मिळू शकते.
चॅनेलमध्ये अशा प्रकारे सहभागी व्हा
- कोणत्याही चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी, सर्वात आधी तुमचे अॅप अपडेट करा.
- आता अॅपवर ओपन करा आणि 'अपडेट्स' टॅबवर जा. येथे स्टेटसच्या खाली तुम्हाला वेगवेगळे चॅनेल दिसतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चॅनेलमध्ये सहभागी होऊ शकता. जर तुम्ही अजून चॅनल फीचर पाहू शकत नसाल तर तुम्हाला अपडेट होण्याची वाट पाहावी लागेल.