Washing Machine : तुमच्या एका चुकीमुळे वॉशिंग मशिनचे पार्ट खराब होऊ शकतात; तुम्हीही 'या' चुका करताय का?
Washing Machine : वॉशिंग मशीनच्या बाबतीत लोकांची सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओव्हरलोडिंग.
Washing Machine : वॉशिंग मशिन (Washing Machine) ही आता अशी एक गोष्ट झाली आहे की ज्याच्याशिवाय आपण विचारच करू शकत नाही. गृहिणींपासून ते अगदी वर्किंग वूमन पर्यंत सर्वच महिलांसाठी (Women) वॉशिंग मशीन फार गरजेची आहे. रोजच्या कामाच्या दगदगीतून इतर घरातील कामं करण्यास अनेक महिलांना वेळ मिळत नाही. यावेळी वॉशिंग मशीन फार उपयुक्त ठरते. यासाठीच त्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, तुमच्या एका चुकीमुळे वॉशिंग मशिनमध्ये बिघाड होऊ शकतो.
वॉशिंग मशीनच्या बाबतीत लोकांची सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओव्हरलोडिंग. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक वॉशिंग मशीनची साईझ वेगवेगळी असते. काही आकाराने लांब आणि मोठ्या असतात, तर काही लहान आकारात येतात. यामध्ये 6kg, 6.5kg, 7kg आणि 8kg मध्ये देखील दिले जाते. एकूणच काय तर वॉशिंग मशीनचा आकार त्याची क्षमता दर्शवतो. म्हणजेच आकार पाहून किती कपडे धुता येतील याचा आपल्याला अंदाज लावता येतो.
पण, काही लोक आहेत जे याकडेअजिबात लक्ष देत नाहीत आणि कपडे चुरगाळून कसेही धुण्यासाठी टाकतात. पण, ही पद्धत कोणत्याही वॉशिंग मशीनसाठी घातक ठरू शकते. जर तुम्ही मशीनमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त कपडे ठेवले तर झाकण नीट बंद होणार नाही. यामुळे मशीन सुरू होऊ शकणार नाही.
तसेच, जर तुम्ही फ्रंट लोड वॉशिंग मशीन वापरत असाल आणि त्यामध्ये बरेच कपडे लोड केले असतील तर कपडे दरवाजाच्या रबरमध्ये अडकू शकतात, ज्यामुळे दरवाजा नीट बंद होऊ शकत नाही. तसेच मशीनचे रबर बूट तुटू शकते.
ओव्हरलोडिंगमुळे मोठे नुकसान
एक गोष्ट लक्षात घ्या की, ओव्हरलोड झाल्यास वॉशिंग मशीन खराब होऊ शकते. याचं कारण असे की जेव्हा वॉशिंग मशिन ओव्हरलोड होते, तेव्हा त्यातील वॉशटब वॉशरच्या केसला त्याचे भाग तुटू लागेपर्यंत खूप ताकद लावतो आणि नंतर टब फुटला तरी त्याची मोटर चालू असते. यामुळे लॉन्ड्री रूममध्ये स्फोटासारखा काही अंदाज लावता येतो. ज्यामध्ये वॉशरचे काही भाग तुटू शकतात आणि सर्वत्र विखुरतात. याशिवाय बरेच कपडे भरल्याने टबवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं. ड्रममध्ये कपड्यांसाठी जागा नसल्यामुळे ते खूप घट्ट होतात आणि डिटर्जंट सगळीकडे पसरू शकत नाही, त्यामुळे कपडे देखील साफ होत नाहीत. त्यामुळे या चुका करू नका.
महत्त्वाच्या बातम्या :
Infinix Smart 8 HD 9 हजारांचा फोन आता फक्त 1300 रुपयांत; पैसे वाचवण्यासाठी काय करावं लागेल?