Twitter Down : जगभरात ट्विटर X ठप्प! एक्सवर पोस्ट करण्यात अडथळे; नेटकरी हैराण
Twitter X Down : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर एक्सचा सर्व्हर मागील एक तासापासून डाउन झालं आहे. ट्विटर वापरण्यात अडथळे येत असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Twitter X Server Down : जगभरातील अनेक भागात सध्या ट्विटर (Twitter X) डाऊन झालं होतं. युजर्सना ट्विटर (Twitter) वापरताना अनेक अडचणी येत होत्या, त्यामुळे नेटकरी हैराण झाले. डाऊन डिटेक्टर याबाबत माहिती दिली होती. सर्व वेबसाईटबाबत माहिती देणाऱ्या डाऊन डिटेक्टर (DownDetector) ने याबाबत माहिती दिली होती. अनेकांना ट्विटर वापरण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता ट्विटरची सेवा पूर्ववत झाली आहे. सुमारे एक तास डाऊन झाल्यानंतर ट्विटर एक्सची सेवा पूर्ववत झाली आहे. युजर्सना ट्विटर एक्सवर पोस्ट करण्यात अडथळे येत होते, पोस्ट, मेसेज दिसत नव्हते.
जगभरात ट्विटर सर्व्हर डाऊन
जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक वेळा ट्विटर डाऊन झाल्याचं समोर आलं आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर एक्सचा सर्व्हर मागील एक तासापासून डाउन झालं आहे. ट्विटर वापरण्यात अडथळे येत असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
जगभरात ट्विटर डाऊन
वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजेच्या सुमारास युजर्सना ट्विटर वापरण्यात अडचणी येत होत्या. काही युजर्सना पोस्ट करण्यात अडचणी येत होत्या, तर काहीचं होमपेज लोड होत नव्हतं. अनेकांनी तक्रार केली की, त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट किंवा मेसेज करण्यात अडथळे येत आहेत.
मस्क यांनी ताबा घेतल्यानंतर अनेक वेळा ट्विटर डाऊन
एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter Deal) मालकी घेतल्यापासून पाचव्यांदा ट्विटर सर्व्हर डाऊन (Twitter X Server Down) झाले आहे. याआधी 01 मार्च 2023 लाही ट्विटरची सेवा ठप्प झाली होती, मात्र काही वेळानंतर ती पुन्हा पूर्ववत झाली.
नवीन फिचर आणण्याची तयारी
ट्विटर (Twitter) एक्स (X) युजर्सकरता एक नवीन फिचर (X New Feature) लवकरच सुरू करणार आहेत. या फिचरच्या मदतीने युजर्सना (Twitter X Users) सरकारी ओळखपत्राच्या मदतीने त्यांचे खाते व्हेरिफाय करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सध्या तरी हे फिचर सर्वांकरता उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. मात्र काही देशात हे फिचर सुरू करण्यात आले आहे. या वैशिष्ट्याद्वारे, कंपनी प्लॅटफॉर्म सुरक्षित करेल, युजर्सचे फ्रॉडपासून संरक्षण करेल आणि वयाशी संबंधित कंटेंटवर लक्ष केंद्रित करेल, असे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :