Plane Crash Special Report : असुरक्षित उड्डाण, दुर्घटना खराब हवेमुळे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे?
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात मराठवाडा आणि विदर्भात महापुरानं थैमान घातलं. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. बळीराजा त्या संकटातून आता कुठे त्या संकटातून सावरत असताना अवकाळीच्या रूपात पुन्हा अस्मानी संकट कोसळलं... गारपीट आणि अवकाळीनं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हादरा दिलाय... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...
यासह मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपीट झाली.... निसर्गाच्या या माऱ्यानं पिकं आडवी पडली आणि बळीराजा हतबल झाला....
लातूरच्या रेणापूर आणि निलंगा या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली... तर औसा, अहमदपूर आणि उदगीरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस.... त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांचं नुकसान झालं...
केवळ पिकांचच नाही तर लातूरमध्ये या पावसानं शेतात काम करणाऱ्या दिगंबर बेलकुंडे या शेतकऱ्याचा जीवही घेतला... वीज अंगावर पडून बेलकुंडे यांचा मृत्यू झाला....
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातल्या अनेक भागातही गारपीटीचा तडाखा बसला... वेचणीचा कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं...
यवतमाळ जिल्ह्यात अवकाळीमुळे ५३४ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय... गहू, हरभरा या पिकांना फटका बसलाय... उमरखेड शहरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय...
बीडमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं ज्वारी पिकाचं मोठं नुकसान केलं या झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त केली...
गेल्या वर्षी मराठवाड्याला महापुरानं वेढलं विदर्भालाही गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात मोठा तडाखा बसला.... त्यातून सावरत असताना आता हा अवकाळीचा तडाखा.... यातून सावरण्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी हीच अपेक्षा...
All Shows

































