Twitter Blue Tick : पैसे देऊन युझर्स का विकत घेत आहेत ट्विटरचं ब्लू टिक? यातून एलॉन मस्कची कमाई नेमकी किती?
Twitter Blue Tick : ट्विटरने पेड ब्लू टिक लॉंच केल्यावर दोन प्रश्न नक्कीच मनात येतात. एकतर युझर्स पैसे देऊन ब्लू टिक का विकत घेत आहेत आणि यातून एलॉन मस्क यांची होणारी कमाई नक्की किती?
Twitter Blue Tick: मागील काही काळात ट्विटरविषयी जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्यात ट्विटरने नामांकित व्यक्तींच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक काढल्याच्या बातमीने चांगलीच खळबळ माजली. या यादीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अशा नामांकित आणि दिग्गज लोकांची नावं होती. एलॉन मस्क यांना वाटत होते की लोकांनी पैसे देऊन ब्लू टिक विकत घ्यावी. काही लोकांनी तर पैसे घेऊन ब्लू टिक विकत सुद्ध घेतली. तर काही दिग्गजांनी अजूनही ब्लू टिकसाठी पैसे दिले नाही आहेत. हे सगळं सुरु असताना ट्विटर हे का करत आहे असा प्रश्न मात्र मनात घर करुन बसतो. आता काही लोक म्हणतील पैसे कमवण्यासाठी. पण आता दुसरा प्रश्न हा आहे की ट्विटर या पेड ब्लू टिकमधून किती पैसे कमावेल? या दोन प्रश्नांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
युझर्स ब्लू टिकसाठी पैसे का देत आहेत?
जेव्हा ट्विटरविषयीच्या बातम्या येत होत्या तेव्हा असे निदर्शनास आले की ट्विटरने सेलिब्रिटींच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक गायब केले आहे. परंतु सामान्य नागरिकांच्या ट्विटर अकाऊंटवर ब्लू टिक आहे. हे सगळं पाहायला थोडं विचित्र वाटलं. असं म्हटलं जाऊ शकतं की, लोक हौस म्हणून पेड ब्लू टिक घेत आहेत. खरंतर, ट्विटर ब्लू टिकच्या सब्सक्रिप्शनसोबत इतरही सुविधा देत आहे. ज्याच्यांकडे पेड ब्लू टिक आहे ते लोक मोठे व्हिडीओ पोस्ट करु शकतात, नवे फीर्चस लवकर घेऊ शकतात. ज्यांच्याकडे पेड ब्लू टिक आहे त्यांच्या पोस्टला प्राधान्य मिळेल. या सुविधांसाठीही लोक ब्लू टिक विकत घेत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
या पेड ब्लू टिकमधून एलॉन मस्क यांची किती कमाई होईल?
माहितीनुसार, 3,58,000 पेक्षा जास्त मोबाईल ग्राहक पेड सब्सक्रिप्शन वापरतात. टेक क्रंचच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात अमेरिकेत सर्वात जास्त 2,46,000 ग्राहकांनी जवळपास 8 मिलियन डॉलर म्हणजेच 65.8 कोटी रुपये पेड सब्सक्रिप्शनसाठी खर्च केले आहेत.
वृत्तानुसार, ट्विटर पेड ब्लू टिकने 17,000 मोबाईल सब्सक्रिप्शनपासून जवळपास 2.4 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. आता ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की माहिती फक्त मोबाईल वापरणाऱ्यांची आहे. वेबसाईट वापरणाऱ्यांची संख्या यात समावेश नाही.
संबंधित बातम्या