Truecaller New Feature : आता स्पॅम कॉल्सपासून होणार सुटका! Truecaller मध्येही नवीन AI फीचर; 'असा' करा वापर
Truecaller New Feature : Truecaller ने आपल्या ॲपमध्ये AI फीचरचा देखील समावेश केला आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून यूजर्सची स्पॅम कॉल्सपासून सुटका होणार आहे.
Truecaller New Feature : सध्या एआय (AI) टेक्नॉलॉजीची (Technology) चर्चा सगळीकडे सुरु आहे. टेक्नॉलॉजीशी संबंधित प्रत्येक कंपनी आपापल्या प्रोडक्ट्समध्ये एआय फीचरचा (AI Feature) समावेश करतायत. आता TrueCaller ने देखील या यादीत आपल्या नावाचा समावेश केला आहे. Truecaller ने आपल्या ॲपमध्ये AI फीचरचा देखील समावेश केला आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून यूजर्सची स्पॅम कॉल्सपासून सुटका होणार आहे. आता हे फीचर नेमकं कसं काम करेल? या संबंधित अधिक माहिती जाणून घेऊयात.
Truecaller मध्ये AI फीचर
खरंतर, Truecaller ने त्याच्या प्रीमियम यूजर्ससाठी एक नवीन मॅक्स प्रोटेक्शन(Max Protection) लेव्हल फीचर लाँच केले आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) म्हणजेच AI टेक्नॉलॉजी वापरून Unproved Contacts चे सर्व कॉल ब्लॉक करतात.
जरी यूजर्सना कॉल करणारी व्यक्ती ट्रूकॉलरच्या डेटाबेसमध्ये नसली तरीही हे ॲप त्याचा कॉल ब्लॉक करेल आणि यूजर्सना स्पॅम कॉलच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकेल. Truecaller मध्ये सध्या सामान्य यूजर्ससाठी मूलभूत संरक्षण स्तर फीचर आहे, ज्यामध्ये फक्त तेच स्पॅम कॉल ब्लॉक केले जातात ज्यांचे नंबर Truecaller च्या डेटाबेसमध्ये आहेत. Truecaller च्या या मॅक्स प्रोटेक्शन लेव्हलचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊयात.
Truecaller Max Protection कसं वापरावं?
- Truecaller चे नवीन फीचर अपडेट v13.58 किंवा त्यानंतरच्या अपडेटमध्ये उपलब्ध असेल. हे फीचर वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमचे Truecaller ॲप अपडेट करावं लागेल.
- आता Truecaller ॲप ओपन करा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स आयकॉनवर क्लिक करा.
- आता सेटिंग्ज ऑप्शनवर जा आणि ब्लॉक ऑप्शन सिलेक्ट करा.
- आता MAX लेव्हलच्या नवीन प्रोटेक्शन लेव्हलचं ऑप्शन सिलेक्ट करा.
- आता हे फीचर वापरण्यासाठी, स्क्रीनवर दिसणाऱ्या प्लॅनला सबस्क्रायब करा.
ट्रूकॉलरचा सबस्क्रिप्शन (Truecaller Subscription) प्लॅन अॅक्टिव्ह केल्यानंतरच यूजर्स हे फीचर वापरू शकतील कारण कंपनीने हे फीचर केवळ प्रीमियम यूजर्ससाठी आणले आहे. तसेच, लक्षात ठेवा की Truecaller चे नवीन मॅक्स लेव्हल प्रोटेक्शन फक्त Android यूजर्ससाठी उपलब्ध आहे. कारण Apple TrueCaller सारख्या कॉलर आयडी सेवांना स्पॅमर्स आणि स्पॅम स्थितींना ब्लॉक करण्याची परवानगी देत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :