इन्स्टाग्राम Threads मध्ये लवकरच 'हे' नवीन अपडेट्स मिळणार; Adam Mosseri यांचं स्पष्टीकरण
Instagrams Threads : थ्रेड्स अॅपने जगभरात लोकप्रियता मिळवली आणि आतापर्यंत 70 मिलियनहून अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे.
Instagrams Threads : सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर ट्विटरशी (Twitter) स्पर्धा करण्यासाठी मेटाने (Meta) 'थ्रेड्स' (Threads App) अॅप लॉन्च केलं. या अॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 70 मिलियन लोकांनी हे अॅप डाऊनलोडही केलं आहे. हे अॅप जरी ट्विटरसारखं असलं तरी यामध्ये ट्विटरसारखे अनेक फिचर्स नाहीयेत. आणि म्हणूनच ट्विटरवरही अनेक लोक 'थ्रेड्स' आणि मेटा ला ट्रोल करत आहेत.
खरंतर, 'थ्रेड्स'मध्ये तुम्हाला DM आणि फॉलोइंग सारखे कॉमन ऑप्शन्स सापडणार नाहीत. मात्र, लवकरच या अॅपमध्ये फॉलोईंग फिर अॅड केलं जाईल अशी माहिती स्वत: इन्स्टाग्रामचे सीईओ Adam Mosseri यांनी दिली आहे. त्याचबरोबर ते पुढे असेही म्हणाले की, पुढील आठवड्यापर्यंत यूजर्सना कोणत्याच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच, हे अॅप अधिक चांगल्या प्रकारे ऑप्टिमाईझ केले जाईल.
लवकरच 'थ्रेड्स'मध्ये 'हे' अपडेट्स मिळतील
फॉलोईंग ऑप्शन
ट्रेंड
रिकमेंडेशन
अॅक्टिव्हिटी पब प्रोटोकॉल
🎉 Threads 🎉
— Adam Mosseri (@mosseri) July 6, 2023
Threads is our new app, built by the Instagram team, for text updates and joining public conversations ✨
We’re hoping Threads can be great space for public conversations, and we’re very focused on the creator communities that already enjoy Instagram.
Available… pic.twitter.com/aFygoAl00I
70 मिलियनहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं अॅप
थ्रेड्स पोस्टच्या माध्यमातून, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी सांगितले की, थ्रेड्स अॅपने 70 मिलियनहून अधिक यूजर्सचा पल्ला ओलांडला आहे. थ्रेड्स हे एकमेव अॅप्लिकेशन आहे ज्याने इतक्या कमी कालावधीत हा आकडा गाठला आहे. कंपनीने अवघ्या 7 तासांत 1 मिलियन यूजर्सची संख्या ओलांडली होती. हा आका चॅट GPT च्या यूजर पेक्षाही सर्वात जास्त होता. ट्विटर पहिल्यांदा लॉन्च झाले तेव्हा 1 मिलियन यूजर्स जोडण्यासाठी 2 वर्ष लागली. त्याचप्रमाणे Facebook ला 10 महिने, Netflix साडेतीन वर्ष, Instagram अडीच महिने, Spotify 5 महिने आणि ChatGPT या AI तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मला गेल्या वर्षी लॉन्च करण्यात 5 दिवस लागले.
खरंतर, इन्स्टाग्राममुळे थ्रेड्सचा यूजरबेस फार मोठ्या संख्येने वाढला आहे. कारण कंपनीने हे अॅप इन्स्टाग्रामशी थेट जोडले आहे. इंटीग्रेशनमुळे इन्स्टाग्राम यूजर्सने थ्रेड्सवर देखील स्विच केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Threads इंस्टॉल आणि लॉग इन कसं कराल? मर्यादा काय? थ्रेड्स संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं