एक्स्प्लोर

Instagram Scam : इन्स्टाग्रामचं नवीन स्कॅम; तुमचं अकाऊंट हॅक होण्याची शक्यता; स्कॅमपासून वाचण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स वापरा

Instagram Scam : इन्स्टाग्रामवर जे लोक कंटेट पोस्ट करतात अशाच लोकांना स्कॅम करणारे लोक आपलं टार्गेट बनविण्यास सुरुवात करतायत.

Instagram Scam : सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) काळात ऑनलाईन स्कॅम (Online Scam) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घोटाळे करणारे लोक फसवणुकीचे नवीन मार्ग शोधण्याच्या तयारीत आहेत. आता तर, घोटाळे करणारे लोक ज्या माध्यमांचा सर्वात जास्त वापर केला जातो अशा अॅप्सचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतायत. सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर (Instagram) आता एक नवीन स्कॅमची सुरुवात झाली आहे. घोटाळे करणारे लोक इन्स्टाग्रामच्या माध्यमातून यूजर्सचं अकाऊंट हॅक करतायत. जर या घोटाळे करणाऱ्यांपासून तुम्हाला तुमचं अकाऊंट हॅक होण्यापासून वाचवायचं असेल तर यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. 

इन्स्टाग्रामवर जे लोक कंटेट पोस्ट करतात अशाच लोकांना स्कॅम करणारे लोक आपलं टार्गेट बनविण्यास सुरुवात करतात. घोटाळे करणारे लोक हे इन्स्टाग्रामवरून मेसेज आल्याप्रमाणे यूजर्सना मेसेज पाठवतात. या मॅसेजमध्ये 'आम्हाला आपल्या अकाऊंटवर असा कंटेट मिळाला आहे जो आमच्या कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन करणारा आहे. यामुळे तुमचं अकाऊंट 24 तासांत बंद होईल अशा प्रकारचा मेसेज लिहीला जातो. 

जर तुम्हाला वाटतंय की तुमच्याकडून काही चूक झाली आहे तर तुम्ही Copyright Objection Form भरू शकता. या फॉर्मला भरण्यासाठी यूजर्सना एक लिंक पाठवली जाते. यामध्ये ज्या यूजर्सचे इन्स्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स आहेत तसेच ज्यांचा रिच जास्त आहे अशा लोकांना टार्गेट केलं जातं. लोकांच्या याच भीतीचा घोटाळा करणारे लोक फायदे उचलतात. आणि यूजरने कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास त्यांचं अकाऊंट हॅक होण्याची शक्यता असते. 

स्कॅमपासून वाचण्यासाठी काय करू शकता? 

क्लिक करू नका : इन्स्टाग्रामवर आलेल्या कोणत्याही लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नका. 

डिटेल्स शेअर करू नका : इन्स्टाग्राम यूजर नेम, पासवर्ड, आयडी या संबंधित कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका. 

अधिकृत वेबसाईटचा वापर करा : जर तुम्ही ब्राऊजरच्या माध्यमातून इन्स्टाग्रामचा वापर करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की घोटाळा करणारे लोक फेक लॉग इन अकाऊंटसुद्धा सुरु करू शकतात. लिंक ओपन केल्यानंतर यूआरएल नक्की चेक करा. 

स्ट्रॉंग पासवर्ड सेट करा : अकाऊंटला सुरक्षित ठेवण्यासाठी एखादा स्ट्रॉंग पासवर्ड सेट करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये कमीत कमी 8 लेटर्स, 1 मोठं लेटर, 1 छोटं लेटर, 1 संख्या आणि 1 विशेष लेटर असणं गरजेचं आहे. 

अकाऊंट हॅक झाल्यास काय कराल?

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं अकाऊंट हॅक होतंय तर लगेच इन्स्टाग्राम सपोर्ट टीमशी संपर्क साधा. आणि तुमचं अकाऊंट हॅक झाल्याची कल्पना द्या. 

महत्त्वाच्या बातम्या : 

iPhone 16 चे फीचर्स लीक, iPhone 12 चे युजर्स खूश, नेमकी भानगड काय? वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget