एक्स्प्लोर

iPhone 16 चे फीचर्स लीक, iPhone 12 चे युजर्स खूश, नेमकी भानगड काय? वाचा सविस्तर

Apple iphone 16 leak Specifications : Apple iphone 16 लॉन्च होण्यापूर्वीच फोनशी संबंधित अनेक गोष्टी लीक झाल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे iphone 16 ची डिझाईन लीक झाली आहे.

Apple iphone 16 leak Specifications : Apple iphone 16 ची प्रतीक्षा तमाम आयफोन प्रेमींना आहे. अशातच आता Apple iphone 16 फोन लीक होण्याची बातमी समोर आली आहे. आयफोन 16 सीरिज या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, या फोनच्या लॉन्च होण्यापूर्वीच फोनशी संबंधित अनेक गोष्टी लीक झाल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे iphone 16 ची डिझाईन लीक झाली आहे. यावर सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. 

खरंतर, आतापर्यंत फोनच्या संबंधित जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार iphone 16 चा कॅमेरा मॉड्यूल iphone 11 आणि iphone 12 सारखाच आहे. कंपनी iphone 12 जसा व्हर्टिकल कॅमेरा मॉड्यूल होता तसाच कॅमेरा मॉड्यूल iphone 16 मध्येदेखील देण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त फोनचा कॅमेरा डिझाईन काहीसा iphone X सीरिजला प्रेरित होणारा आहे. 

iphone 16 ची डिझाईन कशी असेल? 

याचाच अर्थ असा होतो की, iphone 16 मध्ये iphone X आणि iphone 12 या दोघांच्या डिझाईनवर आधारित असेल. अर्थात आयफोन 16 चा फ्रंट लूक हा इतर आयफोनच्या तुलनेत वेगळा असणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर iphone 16 शी संबंधित अनेक मीम्सही वायरल होत आहेत. यामध्ये iphone 12 चे यूजर्स iphone 13, 14 आणि 15 या आयफोनची चेष्टा करतायत. याचं कारण म्हणजे iphone 16 ची लीक झालेली कॅमेरा डिझाईन ही काहीशा फरकाने iphone 12 सारखीच आहे. 

iphone 16 चे फिचर्स कसे असतील?

मिळालेल्या माहितीनुसार, iphone 16  मध्ये iphone 15 प्रमाणेच आपल्याला कटआऊट असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. iphone 16 आणि iphone 16 plus यामध्ये आपल्याला पूर्वीप्रमाणेच 6.1 इंच आणि 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, प्रो व्हेरिएंट्समध्ये आपल्याला काही बदल पाहायला मिळू शकतात. रिपोर्ट्सनुसार, iphone 16 pro मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले आणि iphone 16 pro max मध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. 

या प्रो सीरिजमध्ये कंपनी A18 Pro चिपसेट देण्याची शक्यता आहे. तेच, स्टॅंडर्ड म्हणजेच नॉन प्रो व्हेरिएंट्स (Pro varients) मध्ये A17 चिपसेट देण्यात आला आहे. याच्या व्यतिरिक्त कंपनी 48 MP चा अल्ट्रा वाईड एॅंगल देण्याची शक्यता आहे. हा हॅंडसेट मोठी बॅटरी आणि चार्जिंग कॅपेसिटीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Xiaomi चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च; दमदार फिचर्स अन् आकर्षक लूकची पर्वणी, Flipkart-Amazon वर विक्रीही सुरू

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
Embed widget