एक्स्प्लोर

Malware : सावधान! फोनमधील 'हे' सहा धोकादायक अॅप्स तातडीने डिलीट करा; नाहीतर तुमचं अकाऊंट रिकामं होईल

Malware : सायबर सिक्युरिटी रिसर्च फर्म ESET ने आपल्या अहवालात म्हटल्यानुसार, एकूण 12 ॲप्समध्ये Vajraspy नावाचा मालवेअर आहे,

Malware : सध्याच्या काळात सायबर क्राईमचं (Cyber Crime) प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच तुम्हीही जर अँड्रॉईड (Android) यूजर असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. तुमच्या फोनमध्ये मालवेअर (Malware) असू शकतो. फोनमध्ये मालवेअर असण्यामागचं कारण असं आहे की, असे सहा अँड्रॉईड ॲप्स (Android Apps) ओळखले गेले आहेत जे दोन वर्षांपासून गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) आहेत आणि या ॲप्समध्ये मालवेअर आहे. या ॲप्सची ओळख एका सुरक्षा एजन्सीने केली आहे. जाणून घेऊयात यामध्ये कोणत्या अॅप्सचा समावेश आहे तसेच हे कोणत्या पद्धतीने कार्य करते. 

सायबर सिक्युरिटी रिसर्च फर्म ESET ने आपल्या अहवालात असं म्हटलं आहे की, एकूण 12 ॲप्समध्ये Vajraspy नावाचा मालवेअर आहे. यामध्ये आतापर्यंत जरी सहा ॲप्स Google Play Store वरून हटविण्यात आले असले तरी अजूनही सहा ॲप असे आहेत ते प्ले स्टोअरवर अजूनही आहेत. हा मालवेअर कोणत्याही अँड्रॉईड फोनची हेरगिरी करू शकतो.

Google Play Store वर मालवेअर असलेल्या ॲप्सची नावे खालीलप्रमाणे :

  • Privee Talk
  • Let’s Chat
  • Quick Chat
  • Chit Chat
  • Rafaqat
  • MeetMe

हे मालवेअर टाळण्यासाठी काय करावे?

तुमच्या फोनमध्ये यापैकी कोणतेही ॲप असल्यास, ते लगेच डिलीट करा. हा मालवेअर तुमच्या फोनमधील कोणतीही माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवू शकतो. याशिवाय, हे तुमच्या नकळत कॉल रेकॉर्ड करू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करणं गरजेचं आहे. याशिवाय तुमच्या फोनच्या फाईल मॅनेजरमध्ये तुम्हाला कोणतीही संशयास्पद फाईल किंवा फोल्डर दिसले तर ते लगेच डिलीट करा.

एजन्सीनं अँड्रॉइड यूजर्सना सांगितलं आहे की, नेहमी अॅप्स डाऊनलोड करताना काळजी घ्या आणि थर्ड पार्टी अॅप्सपासून सावध राहा. तसेच, कोणतंही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू, त्यासंदर्भातील कमेंट्स नक्की वाचा. यामुळे तुम्हाला अॅपसंदर्भात माहिती मिळण्यासोबतच ते कितपत खात्रीशीर आहे, याची माहिती मिळेल. त्यासोबतच तुमच्या गरजेनुसारच अॅप्सना परवानग्या द्या आणि अनट्रस्टेड वेबसाईट किंवा सोर्सेसना एक्सेस देणं टाळा. कोणतीही वेबसाईट किंवा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिचं डोमेन नेम नक्की चेक करा. जर डोमेन नेम मिसिंग असेल, तर लिंकवर क्लिक करु नका. 

महत्त्वाच्या बातम्या :

Airtel News : Airtel ला टक्कर Jio चा मोफत प्लॅन; कॉलिंग आणि डेटावर मिळणार OTT सबस्क्रिप्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संतापVijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीकाAndheri Hit And Run Case : एक कार-दोन तरुण! पुण्यानंतर मुंबईच्या अंधेरीत हिट अँड रन...City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 5 जुलै 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये, भाजपच्या माजी खासदाराने डिवचले
राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये, भाजपच्या माजी खासदाराने डिवचले
Nashik Crime : घरात घुसून 18 वर्षीय तरुणाला संपवलं, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही, नाशिक पुन्हा हादरलं!
घरात घुसून 18 वर्षीय तरुणाला संपवलं, शेजारी झोपलेल्या भावालाही समजलं नाही, नाशिक पुन्हा हादरलं!
Embed widget