Unnecessary Electronic Gadgets : कधीही खरेदी करू नका 'ही' 10 गॅजेट्स, तुमचे पैसे वाया जातील!
अनेकदा अनावश्यक गॅजेट्सदेखील आपण खरेदी करतो आणि त्या उगाच पैसे वाया घालवत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे 10 गॅजेट्स सांगणार आहोत, जे तुम्ही खरेदी करुन पैसे वाया घालवणार आहात. पाहुयात कोणते आहेत हे गॅजेट्स...
Unnecessary Electronic Gadgets : सध्या आपण अनेक जीवनशैली सोपी, (Gadgets) साधी आणि चांगली करण्यासाठी अनेक गॅजेट्सचा वापर करत असतो. या गॅजेट्सचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करतो. मात्र काही अनावश्यक गॅजेट्सदेखील आपण खरेदी करतो आणि त्या उगाच पैसे वाया घालवत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे 10 गॅजेट्स सांगणार आहोत, जे तुम्ही खरेदी करुन पैसे वाया घालवणार आहात. पाहुयात कोणते आहेत हे गॅजेट्स
1) Dyson Air-Purifying Headphones -
एअर प्युरिफिकेशन सगळ्यात जास्त प्रभावी काम तेव्हाच करू शकते जेव्हा खूप जास्त गर्दी असते. किंवा गजबजलेले वातावरण असते. अर्थात हे गॅजेट सुद्धा ह्याच प्रकारे काम करते. म्हणजेच जर तुमच्या आजुबाजूला भरपूर आवाज होत असेल तर त्या वेळी हे गॅजेट Advance Noise Cancellation चे काम करते. मात्र जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा जास्त गजबज नसलेल्या ठिकाणी काम करत असाल तर या गॅजेटचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. कारण हे गॅजेट कदाचित छोट्या रूममध्ये किंवा जास्त गडबड नसलेल्या ठिकाणी प्रभावीपणे काम करत नाही.
2) Egg- Shaped Smart Toilet -
या गॅजेटची डिझाइन फक्त वेगळी आहे. खरं तरं हे गॅजेट काम तेच करते जशी कामे traditional toilets करतात. यात जास्त असे कोणतेच नवीन फिचर्स नाही आहेत आणि कदाचित या नवीन फिचर्सची काही गरज देखील नाही आहे. याच कारणामुळे यासाठी पैसे खर्च करणं उपयोगाचे नाही.
3) Amazon Astro -
वैयक्तिक कामांसाठी ठेवण्यात आलेले रोबोट तुम्ही विचार करता तेवढं काम करु शकत नाही. माणूस म्हणून आपण जेवढं काम करू शकतो तेवढी या रोबोटची कॅपॅसिटी नसते. याशिवाय या रोबोट मध्ये आपण जेवढ्या कामाचे फंक्शन फिक्स करून ठेवू तेवढेच काम हे रोबोट करू शकतात. इथे लिमिटेशन्स येतात. एका ठराविक काळापुरते हे गॅजेट खूप उपयुक्त आहे. परंतु दैनंदिन कामासाठी याचा काहीही वापर होणार नाही. म्हणून हे गॅजेट खरेदी करणे म्हणजे वेस्ट ऑफ मनी झाल्यासारखे आहे.
4) Banana Phone Handset -
या फोनमध्ये फक्त डिझाईन बदलले आहे. बाकी या गॅजेटचे काम आपल्या स्मार्टफोन सारखेच आहे. या आयटमकडे बघितल्यावर आपण ज्या पद्धतीने विचार करतो की कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये हा कसा असेल तर तसे याच्यामध्ये कोणतेही नवीन फिचर्स ॲड करण्यात आलेले नाही आहेत. संवाद साधण्यासाठी जी प्राथमिक गरज आहे ती गरज आपले स्मार्टफोनसुद्धा आपल्याला पुरवतात. म्हणूनच हे गॅजेट खरेदी करून कदाचित तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.
5) Electric Wine Bottle Opener -
इलेक्ट्रिक वाइन बॉटल ओपनर चांगले काम करतो. त्याचा वापर करून वाइनची बॉटल सहज उघडू शकतो. पण आपण जो पुर्वीपासून कॉर्सस्क्रू वापरतो तो खूप चांगल्या प्रकारे काम करतो. त्यामुळे या नवीन गॅजेटची तेवढी गरज नाही. बॅटरी आणि इलेक्ट्रिक बॉटल ओपनर विकत घेणे म्हणजे ते फक्त तुमचे पैसे वाया घालवण्या सारखेच आहे.
6) Levitating Bluetooth Speaker -
हा स्पीकर फक्त दिखाव्यासाठी म्हणून खूप चांगला आहे. मात्र बाकीच्या स्पीकर ज्या पद्धतीने काम करतात त्याच्यासारखा जा काम करतो. याची ऑडिओ कॉलिटीदेखील तो जास्त वाढवत नाही बाकी स्पीकर सारखेच काम करतो. फक्त दिखाव्यासाठी म्हणून जर तुम्ही हा गॅजेटवर पैसे घालत असाल तर तुम्ही तुमचे पैसे वाया घालवल्यासारखे होईल.
7) USB Clock Fan -
यूएसबी क्लॉक फॅन हा घड्याळ आणि फॅन यांचे कॉम्बिनेशन आहे.खरंतर प्रॅक्टिकली आणि लॉजिकली विचार केला तरी फक्त दिसण्यापुरतं कुल आहे पण याचा वापर तसा काहीच नाही आहे. तसं तर नुसता फॅन आणि घड्याळ हे आपापल्या जागी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे या घड्याळाची कामासाठी अशी काही गरज नाही.
8) Screen Magnifier -
फोनच्या छोट्या स्क्रीनवर सारख-सारखं व्हिडिओ बघणं किंवा व्हिडिओ गेम खेळणे हे तुमच्या डोळ्यांसाठी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. म्हणून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून हे नवीन गॅजेट मार्केटमध्ये आले आहे. परंतु ही मोठी स्क्रीन थोड्या वेळापुरती वापरणे सोयीस्कर आहे. याच कारणामुळे हे गॅजेट खरेदी करणे तेवढे फायदेशीर नाही.
9) Sonic Automatic Toothbrush -
आपण रोज वापरत असले ब्रश आणि हा नवीन ब्रश यामध्ये तसा काही फरक नाही आहे. या ब्रशचा वापर करून तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता. मात्र याची किंमत तुलनेने खूप जास्त आहे. फक्त वेळ वाचत आहे म्हणून हा ब्रश खरेदी करणे तेवढे सोयीस्कर नाही. या ब्रशचे दोन पार्ट आहेत, त्याचा जो वरचा पार्ट आहे तो इलेक्ट्रिक आहे आणि या कारणाने तो खूप महाग आहे. म्हणून हे गॅजेट खरेदी करणे गरजेचे नाही.
10) FAT- BURNING AB BElT -
फॅट बर्निंग बेल्ट वैज्ञानिक रित्या प्रभावी असल्याचे अगदी थोडेच वैज्ञानिक पुरावे आहेत. हेल्दी डायट आणि व्यायाम खूप जास्त निरोगी आयुष्यासाठी खूप जास्त गरजेचे आहे. त्यामुळे अशा गॅजेटवर लवकर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. हे गॅजेट खरेदी करणे म्हणजे पूर्ण वेस्ट ऑफ मनी करण्यासारखे आहे
इतर महत्वाची बातमी-