(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सर्वाधिक विक्री होणाऱ्या 'या' स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलत, iPhone 14 देखील सवलतीच्या दरात
ई-कॉमर्स साइट्सवर स्मार्टफोन्सवर सवलत (Smartphone Discount) दिली जात आहे. आयफोनसह इतरही फोनवर सवलत दिली जात आहे.
Smartphone Discount : सध्या सर्व ई-कॉमर्स साइट्सवर स्मार्टफोन्सवर सवलत (Smartphone Discount) दिली जात आहे. हे लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी सर्वाधिक विक्री होणाऱ्या फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती घेऊन आलो आहोत. iPhone 14 या Apple फोनची मूळ किंमत 69,990 रुपये आहे, जी तुम्ही सध्या 61,999 रुपयांना खरेदी करु शकता. iPhone 14 मध्ये तुम्हाला 128GB स्टोरेज मिळेल. याशिवाय या फोनवर तुम्हाला 39,150 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे.
Google Pixel 6 A
Google Pixel 6A फोनची मूळ किंमत 43,999 रुपये आहे, जी तुम्ही फक्त 34,499 रुपयांना खरेदी करु शकता. या गुगल फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. त्याच वेळी, तुम्हाला बँक ऑफ बडोदा कार्डवर 10 टक्के सूट देखील दिली जात आहे.
नथिंग फोन (1)
नथिंगचा हा फोन 37,999 रुपयांना आहे, तो फोन तुम्ही सध्या 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. नथिंग फोन (1) मध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. याशिवाय तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल.
realme 11 Pro 5G
Realme च्या या फोनमध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. या Realme फोनची मूळ किंमत 30,999 रुपये आहे, जी तुम्ही फक्त 27,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनवर अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के सूट मिळेल.
REDMI Note 12 Pro 5G
या Redmi फोनची मूळ किंमत 27,999 आहे, जी तुम्ही फक्त Rs 21,999 मध्ये खरेदी करू शकता. या Redmi फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. Axis Bank कार्डद्वारे तुम्हाला या फोनवर 5 टक्के सूट देखील मिळेल. याशिवाय ई-कॉमर्स साइट्सवर तुम्हाला इतर अनेक फोनवरही चांगली सूट मिळू शकते.
iPhone 14 देणार ही सेवा
आयफोन (iPhone) 14 वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अॅपलने iPhone 14 वापरणाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. Apple ने घोषणा केली की, कंपनी आणखी 2 वर्षांसाठी iPhone 14 वापरकर्त्यांना इमर्जन्सी SOS फीचर (Emergency SOS) मोफत देणार आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी एक्स पोस्टमध्ये ही माहिती दिली. या सेवेमुळे अॅपल युझर्सला मोठा फायदा होणार आहे. कंपनीने iPhone 14 सह इमर्जन्सी एसओएस फीचर लाँच केले आहे. ज्यांना इमर्जन्सी एसओएस सेवा काय आहे हे माहित नाही त्यांच्यासाठी अॅपल फाइंडमाय अॅपद्वारे त्यांचे स्थान सॅटेलाइटद्वारे पाठवण्याची आणि या सेवेद्वारे अडचणीत असलेल्या लोकांना iMessage द्वारे संदेश पाठवण्याची सुविधा देते. या सुविधेमुळे संकट काळात आपला जीव वाचवण्यासाठी मदत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: