Apple iphone 14 Emergency SOS : आयफोनच्या 'या' मॉडेलवर भन्नाट मोफत सेवा; संकटकाळात होणार मदत, जीवही वाचवणार!
अॅपलने iPhone 14 वापरणाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. Apple ने घोषणा केली की, कंपनी आणखी 2 वर्षांसाठी iPhone 14 वापरकर्त्यांना इमर्जन्सी SOS फीचर (Emergency SOS) मोफत देणार आहे.
Apple iphone 14 Emergency SOS : आयफोन (iPhone) 14 वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अॅपलने iPhone 14 वापरणाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. Apple ने घोषणा केली की, कंपनी आणखी 2 वर्षांसाठी iPhone 14 वापरकर्त्यांना इमर्जन्सी SOS फीचर (Emergency SOS) मोफत देणार आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी एक्स पोस्टमध्ये ही माहिती दिली. या सेवेमुळे अॅपल युझर्सला मोठा फायदा होणार आहे.
कंपनीने iPhone 14 सह इमर्जन्सी एसओएस फीचर लाँच केले आहे. ज्यांना इमर्जन्सी एसओएस सेवा काय आहे हे माहित नाही त्यांच्यासाठी अॅपल फाइंडमाय अॅपद्वारे त्यांचे स्थान सॅटेलाइटद्वारे पाठवण्याची आणि या सेवेद्वारे अडचणीत असलेल्या लोकांना iMessage द्वारे संदेश पाठवण्याची सुविधा देते. या सुविधेमुळे संकट काळात आपला जीव वाचवण्यासाठी मदत होणार आहे.
कोणत्या देशात ही सेवा उपलब्ध आहे?
खरं तर, Apple Key Emergency SOS सेवा सुरुवातीला यूएस आणि कॅनडाने सुरू केली होती. त्यांच्या कंपनीचा विस्तार 16 देशांमध्ये झाला होता. मात्र ही सेवा भारतात उपलब्ध नव्हती. ही सर्विस बाकी देशात वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे त्यामुळे आता ही सर्विस लॉंच करणं शक्य आहे. मात्र त्यासाठी सरकारकडून काही परवानग्या घेणं गरजेचं असणार आहे. सध्या, सॅटेलाईटद्वारे SOS ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड, न्यूझीलंड, पोर्तुगाल, स्पेन, स्वित्झर्लंड, यूके आणि यूएसमध्ये उपलब्ध आहे. अॅपल सध्या ही SOS सेवा विनामूल्य देत आहे. मात्र येत्या काळात कंपनी त्यासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करणार आहे. हे सबस्क्रिप्शन मॉडेलवर काम करेल. iPhone 14 व्यतिरिक्त कंपनीच्या नवीनतम मॉडेलमध्ये लोकांना ही सेवा 2 वर्षांसाठी मिळेल.
iphone 15 मध्येही ही सेवा उपलब्ध...
या सर्व वापरकर्त्यांना आणखी एक वर्ष सॅटेलाईटद्वारे इमर्जन्सी SOS सेवेची मोफत चाचणी मिळत राहील. त्याच वेळी, आयफोन 15 वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सेवा सक्रिय झाल्याच्या दिवसापासून दोन वर्षांसाठी विनामूल्य असेल.सॅटेलाईटद्वारे इमर्जन्सी SOS सेवा सेल्युलर आणि वायफाय कव्हरेज नसलेल्या भागात कार्य करते हे सिद्ध झाले आहे. अॅपलच्या या सेवेच्या मदतीने जगभरात अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे ही सेवा सर्वत्र उलब्ध होण्याची गरज आहे.
इतर महत्वाची बातमी-