Elon Musk यांनी ट्विटरची 'ही' सेवा केली बंद, आता युजर्सना करावं लागणार हे काम
व्यावसायिक कंपन्या, संस्था व सरकारी संस्था यांच्यासाठी ट्विटर टिकमार्कसाठी व्हेरिफिकेशनचं काम सुरू करण्याता आलं आहे.
![Elon Musk यांनी ट्विटरची 'ही' सेवा केली बंद, आता युजर्सना करावं लागणार हे काम search option on twitter web access blocked by elon musk tech news Elon Musk यांनी ट्विटरची 'ही' सेवा केली बंद, आता युजर्सना करावं लागणार हे काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/22/372696409eda23736e33d97aa7242ffa1682133478268601_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Twitter Advance Search : गेल्या काही महिन्यापासून इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळविल्यानंतर त्यांच्या घेतलेल्या निर्णयामुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांनी ट्विटरची मालिकी मिळविल्यानंतर कंपनीच्या सेवांमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे मस्क यांच्यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रियाही उमटल्याचं दिसून आलं. काही दिवसापूर्वी ट्वविटरवरून ब्लू टिक हटवल्यामुळे चर्चेत आले होते. यावर युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर इलॉन मस्क यांनीही हा दिवस अनेक बाबतीत विशेष असा आहे, ट्वीट केलं होतं. पण अशातच इलॉन मस्क यांनी ट्विटर वेबची एक विशेष सेवा बंद केली आहे. त्यामुळे मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता ही सेवा बंद करण्यात करण्यात आल्यामुळे ट्विटरच्या ग्राहकांना माहिती सर्च करण्याआधी एक पर्याय निवडावा लागणार आहे.
ही वेब सेवा बंद करण्यात आली
आता ट्विटरकडून अॅडवान्स सर्चचा पर्याय हटवण्याचा निर्णय घेण्याता आला आहे. यामुळे आता वेब यूजर्सना लॉगिन केल्याशिवाय माहिती शोधता येणार नाही. यापूर्वी ट्विटरवर एखाद्या व्यक्तीला किंवा विषयाचा शोध घेण्यासाठी लॉग इन करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, इथून पुढे युजर्सना असं करता येणार नाही. कारण तुम्ही ट्विटरवर एखादी माहिती शोधत असाल किंवा सर्च करत असाल, तर आधी लॉगिनचा पर्याय निवडावा लागणार आहे. अन्यथा तुम्हाला ट्विटरवर माहिती किंवा एखाद्या व्यक्तीला सर्च करू शकणार नाही. त्यामुळे यापुढे लॉगिन करूनच माहिती सर्च करता येणार आहे.
ब्लू टिकसाठी मोजवे लागणार पैसे
आता ट्विटरवर एखाद्या व्यक्तीला ब्लू टिक हवं असेल तर त्यासाठी खास व्यक्ती किंवा सेलिब्रेटीच असावं, अशी अट किंवा नियम नाही. कोणत्याही व्यक्तीला ब्लू टिक मिळवता येणार आहे. परंतु यासाठी कंपनीकडून दर महिन्याला काही पैसे आकारले जाणार आहेत. यानंतरच ब्लू टिकची सेवा यूजर्सना उपलब्ध होणार आहे. भारतातील युजर्सनी कंपनीला महिन्याला 650 ते 900 रूपये दिल्यानंतर ब्लू टिकची सेवा मिळणार आहे.
तसेच, याशिवाय व्यावसायिक कंपन्या, संस्था यांच्यासाठी व्हेरिफिकेशनचं काम सुरू करण्यात आलं असून ब्लू टिकप्रमाणेचं गोल्ड टिकसाठी दर महिन्याला 82 हजार रूपये मोजावं लागणार आहे. कारण ट्विटरची आर्थिक वृद्धी फक्त जाहिरातदारांवर अवलंबून न राहता कंपनीला या सेवांच्या बदल्यात स्वत:चा आर्थिक स्त्रोत निर्माण करायचं आहे. त्यामुळे ही व्हेरिफिकेशन सेवा सुरू करण्यात आल्याचं समजतंय.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)