Reliance Jio : Jio ग्राहकांना मोठा धक्का; कंपनीने बंद केला सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओने 119 रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. आता या प्लॅनकरता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Reliance Jio : Reliance ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांकरता नेहमी विविध प्लॅन (Plan) लाँच करत असते. हे सर्व प्लॅन ग्राहकांना परवडणारे असतात. मात्र आता Reliance Jio ग्राहकांना आता मोठा धक्का बसू शकतो. Jio ने आपल्या आॅफरमधून 119 रूपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. टेलिकॉम (Telecom) कंपनीने 2021 मध्ये झालेल्या दरवाढीनंतर हा प्लॅन लॉन्च केला होता.
119 रूपयांच्याा जिओच्या प्लानमध्ये 14 दिवसांची व्हॅलिडीटी, दररोज 1.5 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग (Unlimited Voice Calling) आणि दररोज 100 एसएमएस (SMS) करण्याचे फायदे वापरकर्त्यांना मिळत होते. हा प्लॅन देशातील कोणत्याच भागात उपलब्ध नाही. मात्र आता ग्राहकांना सगळ्यात स्वस्त असणाऱ्या प्लॅनकरता 30 रूपये जास्त द्यावे लागणार आहेत. हे पाऊल याआधी Airtel ने उचलले होते. Reliance Jio नवीन प्लॅन आता 149 रूपयांचा असणार आहे.
रिलायन्स जिओचा 149 रूपयांचा प्लॅन
Reliance Jio च्या 149 रूपयांच्या प्लॅन हा 20 दिवसांच्या वॅलिडीटीसह (Validity) येणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioCinema, JioCloud आणि JioTv हे पर्याय मिळणार असून अनलिमिटेड Voice Calling , 100 SMS तसेच 1GB डेटा मिळणार आहे. हा प्लॅन घेणारे वापरकर्ते जिओ वेलकम ऑफरसाठी (Jio Welcome Offer) पात्र नाहीत. कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत एअरटेलच्या (Airtel) 155 रुपयांच्या सर्वात स्वस्त प्लॅनच्या अगदी जवळ आहे. जर तुम्ही व्हॅलिडीटी आणि Voice Calling याकरता फायद्याच्या प्लॅनचा विचार करत असाल तर 149 रूपयांचा हा प्लॅन तुमच्याकरता फायदेशीर असू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांकरता अनलिमिटेड Voice Calling मिळते.
रिलायन्स जिओ या देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनीला आपला ARPU ची आकडेवारी वाढवण्यास मदत मिळणार आहे. रिलायन्स जिओला एअरटेलच्या ARPU च्या जवळ पोहोचण्यासाठी दरात वाढ आणि अधिक पैसे देणाऱ्या ग्राहकांची गरज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Threads Web Version : Threads चं वेब व्हर्जन सुरू;असे करा कनेक्ट, पाहा डिटेल्स