एक्स्प्लोर

What is Cloud Laptop or Computer : Laptop आणि Computer कंपन्यांना Jio देणार मोठा धक्का; लाँच करणार स्वस्तात मस्त Cloud Laptop, कसं काम करेल Cloud Laptop?

टेलिकॉम क्षेत्रातील नंबर वन कंपनी बनल्यानंतर रिलायन्स जिओ आता पीसी म्हणजेच कॉम्प्युटर मार्केटच्या दिशेने वळण्याच्या तयारीत आहे. जिओ कंपनी आता क्लाऊड लॅपटॉप लाँच करण्याची तयारी करतआहे.

What is Cloud Laptop or Computer : टेलिकॉम क्षेत्रातील नंबर वन कंपनी बनल्यानंतर रिलायन्स जिओ आता पीसी म्हणजेच कॉम्प्युटर मार्केटच्या दिशेने वळण्याच्या तयारीत आहे. जिओ कंपनी आता क्लाऊड लॅपटॉप लाँच करण्याची तयारी करत आहे. ज्याची किंमत सुमारे 15,000 रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने अद्याप क्लाउड लॅपटॉपची किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पण कंपनीची पार्श्वभूमी पाहता याची किंमत युजर फ्रेंडली असेल असे म्हटले जात आहे. ETच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ एचपी एसर, लेनोवोसह इतर  कम्युटर निर्मात्यांसोबत क्लाउड लॅपटॉपवर काम करत आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या विषयाशी संबंधित लोकांनी सांगितले की, सध्या एचपी क्रोमबुकवर 'क्लाउड लॅपटॉप'साठी चाचणी सुरू आहे. रिलायन्स जिओ मासिक सबस्क्रिप्शनच्या आधारे लोकांना स्वस्त दरात क्लाउड लॅपटॉप उपलब्ध करण्याची शक्यता आहे. तुम्हाला क्लाऊड कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप कसे काम करतात आणि ते लॅपटॉप आणि कॉम्प्युटर मार्केटला कसे नुकसान पोहोचवणार आहेत हे सांगणार आहोत.

काय आहे क्लाऊड लॅपटॉप?

जे लोक गेमिंग क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा गेमिंग करतात त्यांना क्लाउड या शब्दाची ओळख असेल.  आपल्याला आपल्या स्मार्टफोनवर गेमिंचे अॅप डाऊनलोड करावे लागत नाही आणि तसेच आपल्याला वेळोवेळी अॅप अपडेट करावे लागत नाही.  क्लाऊड सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्ही गेम खेळू शकता आणि त्यासाठी तुम्हाला फक्त काही फी भरावी लागेल. गेमचा सर्व्हर, स्टोरेज याची सर्व जबाबदारी गेमिंग कंपनीची असून सामान्य स्मार्टफोनमधूनही तुम्ही हाय ग्राफिक्स गेम्स खेळू शकता. त्याचप्रमाणे क्लाऊड कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपही काम करतात. असे होते की आपल्याला एक साधा संगणक किंवा लॅपटॉप खरेदी करावा लागतो आणि आपण क्लाउड सर्व्हिसद्वारे वेब ब्राउझर, गेमिंग, फाइल्स, सॉफ्टवेअर इत्यादी या गॅझेट्सशी संबंधित सर्व सेवा उपलब्ध होते. म्हणजेच तुम्हाला तुमच्या लॅपटॉपमध्ये काहीही इन्स्टॉल करण्याची गरज नाही. क्लाऊड सेवेसाठी तुम्ही सर्व काही वापरू शकाल.  

साध्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल ठेवावं लागतं, त्यानंतर तुम्ही त्यासंबंधीचं काम करू शकता. पण क्लाऊड लॅपटॉपमध्ये क्लाऊडच्या माध्यमातून सॉफ्टवेअर अॅक्सेस करता आणि त्यावर तुमचे काम सेव्ह ही करू शकता आणि मग ते कोठूनही अॅक्सेस करता येते. क्लाऊड लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमधील प्रत्येक गोष्ट इंटरनेट-आधारित आहे आणि आपण हाय स्पीड इंटरनेटद्वारे सॉफ्टवेअर सेवा, फाईल्सवर काम करु शकणार आहोत. 

लॅपटॉप आणि संगणक मार्केटला फटका बसणार

क्लाऊड लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आल्याने लॅपटॉप आणि कॉम्प्युटर मार्केटचे नुकसान होईल. सध्या लोकांच्या गरजेनुसार कंपनीने वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल्स तयार केली असून प्रत्येक मॉडेलमध्ये वेगवेगळे हार्डवेअर स्पेक्स दिले आहेत. पण क्लाऊड कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आल्यानंतर या सगळ्याची गरज भासणार नाही आणि बेसिक लॅपटॉपही आजच्या हाय-एंड लॅपटॉपप्रमाणे काम करेल. म्हणजेच क्लाऊड लॅपटॉप मेमरी, रॅम, ग्राफिक्स कार्ड असलेल्या लॅपटॉपची गरज आरामात पूर्ण करेल. याचा फटका मोठ्या कंपन्यांना बसणार असून महागड्या संगणक किंवा लॅपटॉप मॉडेल्सची विक्री कमी होईल. 

इतर महत्वाची बातमी-

Apple iphone 14 Emergency SOS : आयफोनच्या 'या' मॉडेलवर भन्नाट मोफत सेवा; संकटकाळात होणार मदत, जीवही वाचवणार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP On Mahapalika Election |  मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special ReportNew India Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक कुणामुळे डुबली? Special ReportShanishingnapur Shanidev | एक मार्चपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलानंच अभिषेक Special ReportSpecial Report Suresh Dhas:Dhananjay Munde यांच्या भेटीमुळे विश्वासार्हतेला तडा, विरोधकांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.