पोको M7 Pro 5G आणि C75 5G स्मार्टफोन लाँच, स्वस्तात मस्त फोनची काय आहेत वैशिष्ट्ये
Poco SmartPhone Price : पोको M7 Pro 5G आणि C75 5G स्मार्टफोन हे सर्वोत्तम डिस्प्ले, कार्यक्षमतेसह किफायतशीर दरात उपलब्ध आहेत.
मुंबई: उत्साहपूर्ण वर्षाची धमाक्यात सांगता करत पोको या भारतातील सर्वात डायनॅमिक ग्राहक टेक ब्रँडने पोको एम७ प्रो ५जी आणि पोको सी७५ ५जी या दोन उल्लेखनीय स्मार्टफोन्सच्या लाँचची घोषणा केली आहे. त्यांच्या संबंधित विभागांमधील मर्यादांना दूर करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले हे डिवाईसेस डिस्प्ले सर्वोत्तमता, कार्यक्षमता आणि किफायतशीरपणाला नव्या उंचीवर घेऊन जातात.
पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशू टंडन म्हणाले, "पोकोमध्ये आमचा सर्वांना सक्षम करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर नेहमी विश्वास आहे. एम७ प्रो ५जी पॉवरहाऊस आहे, जो विभागातील सर्वात तेजस्वी एएमओएलईडी डिस्प्ले, सर्वोत्तम ऑडिओ आणि फ्लॅगशिप-ग्रेड कॅमेरांसह मिड-रेंज श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जातो. तसेच, सी७५ ५जी ओन्ली सोनी सेन्सरसह सर्वात किफायतशीर ५जी स्मार्टफोन आहे. या लाँचसह पोको चाहत्यांना अधिक नाविन्यता आणि अधिक मूल्य देण्याच्या मिशनप्रती बांधील आहे."
लुनार डस्ट, लेव्हेंडर फ्रास्ट आणि ऑलिव्ह ट्विलाइटमध्ये उपलब्ध असलेला एम७ प्रो ५जी आकर्षक व शक्तिशाली आहे. पोको एम७ प्रो ५जी १,००० रूपयांची बँक सूट (एसबीआय/एचडीएफसी/आयसीआयसीआय) किंवा १,००० रूपयांचा एक्स्चेंज + ३ महिन्यांचे नो-कॉस्ट ईएमआय (एनसीई) सह १३,९९९ रूपयांच्या स्पेशल लाँच किमतीत उपलब्ध आहे.
एनचांटेड ग्रीन, अॅक्वा ब्ल्यू आणि सिल्व्हर स्टारडस्ट या रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या पोको सी७५ ५जी डिवाईसमध्ये स्टाइल, उपयुक्तता व टिकाऊपणाचे उत्तम संयोजन आहे. पोको सी७५ ५जी लाँच कालावधीदरम्यान फक्त ७,९९९ रूपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.
दोन्ही डिवाईसेस फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील, जेथे सी७५ ५जी ची विक्री १९ डिसेंबरपासून सुरूवात होईल आणि एम७ प्रो ५जी ची विक्री २० डिसेंबरपासून सुरू होईल.
पोको एम७ प्रोज ५जी - अल्टिमेट एंटरटेन्मेंट बीस्ट
अद्वितीय व्हिज्युअल सर्वोत्तमता: विभागातील सर्वात तेजस्वी एमओएलईडी डिस्प्ले तुमचे लक्ष वेधून घेतो, जेथे ६.६७ इंच जीओएलईडी एफएचडी+ स्क्रिनवर आकर्षक २१०० नीट्स पीक ब्राइटनेस मिळतो. एचडीआर१०+ आणि १२० हर्टझ अॅडप्टिव्ह रिफ्रेश रेटसह प्रत्येक फ्रेम आकर्षक सुस्पष्टता आणि तरलतेच्या माध्यमातून वास्तविकतेचा अनुभव देते.
सर्वोत्तम ऑडिओ: डॉल्बी अॅटमॉस-पॉवर्ड स्पीकर्सच्या माध्यमातून सिनेमॅटिंग अनुभवाचा आनंद घ्या, ज्यामध्ये सर्वोत्तम साऊंडसाठी ३०० टक्के व्हॉल्यूम बूस्ट आहे.
फ्लॅगशिप-ग्रेड फोटोग्राफी: नयनरम्य लँडस्केपपासून रात्रीच्या वेळी आकर्षक फोटोंपर्यंत ५० मेगापिक्सल सोनी एलवायटी-६०० कॅमेरासह ओआयएस आणि विभागातील सर्वात मोठे एफ/१.५ अर्पेचर प्रत्येक फोटो आकर्षक व अपवादात्मक असण्याची खात्री देते. एआय नाइट मोड आणि एआय झूम सारख्या एआय-पॉवर्ड वैशिष्ट्यांसह फोटो अधिक आकर्षकपणे कॅप्चर करता येतात.
आकर्षक डिझाइनसह टिकाऊपणा: स्लिम ७.९९ मिमी प्रीमियम ड्युअल-टोन फिनिश आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ५ सह डिझाइन करण्यात आलेल्या एम७ प्रो ५जी मध्ये स्टाइल व क्षमतेचे उत्तम संयोजन आहे.
पॉवर-पॅक कार्यक्षमता: मीडियाटेक डायमेन्सिटी ७०२५ अल्ट्रा चिपसेट आणि ७,८२०.५ मिमी२ ग्रॅफाईट कूलिंग सिस्टमची शक्ती असलेला हा डिवाईस सुलभ मल्टीटास्किंग आणि विनासायास गेमिंगची खात्री देतो.
विश्वसनीय बॅटरी लाइफ: विशाल ५११० एमएएच बॅटरीसह ४५ वॅट फास्ट चार्जिंग डिवाईस प्रत्येकवेळी कार्यरत असण्याची खात्री देते.
पोको सी७५ ५जी - भारतातील सर्वात किफायतशीर ५जी स्मार्टफोन
फ्यूचर-रेडी कनेक्टीव्हीटी: अविश्वसनीय दरामध्ये उपलब्ध असलेल्या सी७५ ५जी मध्ये ड्युअल ५जी सिम सपोर्ट आहे, ज्यामधून तुम्ही नेहमी आधुनिक नेटवर्क तंत्रज्ञानाशी कनेक्टेड असण्याची खात्री मिळते.
सुधारित फोटोग्राफी: ५० मेगापिक्सल सोनी कॅमेरा असलेला हा सेगमेंट-फर्स्ट डिवाईस ४-इन-१ पिक्सल बायनिंग आणि प्रगत अर्पेचर सेटिंग्जसह आकर्षक फोटो कॅप्चर करतो. क्लासिक फिल्म फिल्टर्स फोटोंमध्ये नॉस्टेल्जिक मोहकतेची भर करतात.
विनासायास कार्यरत राहणारा पॉवरहाऊस: स्नॅपड्रॅगन ४एस जेन २ प्रोसेसरची शक्ती, विभागातील एकमेव ४एनएम चिप असलेला सी७५ ५जी गेमिंग, मल्टीटास्किंग अशा बाबींसाठी विनासायास कार्यक्षमता देतो.
सर्वात मोठा, स्मूदेस्ट डिस्प्ले: ६.८८ इंच एचडी+ स्क्रिनसह ६०० नीट्स ब्राइटनेस आणि १२० हर्टझ रिफ्रेश रेट आकर्षक व्हिज्युअल्सची खात्री देतात. टीयूव्ही-प्रमाणित आय केअरसह दीर्घकाळापर्यंत आरामात मनोरंजनाचा आनंद घ्या.
दीर्घकाळपर्यंत टिकाऊपणासाठी डिझाइन: ५१६० एमएएच बॅटरीसह १८ वॅट फास्ट चार्जिंग, आयपी५२ स्प्लॅश रेसिस्टण्स आणि एर्गोनॉमिक डिझाइन सी७५ ५जी आव्हानात्मक काळात टिकून राहण्याची खात्री देतात.