BGMI : आता iPhone यूजर्सनाही BGMI गेमिंग अॅप उपलब्ध, तुमच्या जुन्या गेमिंग अकाउंटला असं करा कंटिन्यू
भारतात बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया (BGMI) या गेमिंग अॅपवर जवळपास एक वर्ष बंदी होती. आता पुन्हा एकदा अँड्रॉईड आणि आयओएस यूजर्ससाठी BGMI उपलब्ध करून देण्यात आला आहे.
BGMI : आता बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (BGMI) हे गेमिंग अॅप सर्व यूजर्ससाठी प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. गेल्या काही दिवसापासून आयओएस यूजर्सना अॅपच्या डाउनलोडिंगमध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या. याचं कारण हे अॅप सर्वांसाठी उपलब्ध झाले नव्हते. परंतु आता कंपनीने तांत्रिक अडचण दूर केली आहे. त्यामुळे हे अॅप प्ले स्टोरवर सहज डाउनलोड करता येणार आहे. या खेळाची निर्मिती करणाऱ्या Krafton सांगितले की, आता BGMI गेम खेळण्यायोग्य आहे. हा गेम 2.5 अपडेटसोबत प्ले स्टोर आणि अॅपस्टोरवरून डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या नवीन अपटेडमुळे यूजर्सना गेमिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होणार आहे. गेल्यावर्षीच अॅपवर बंदी घालण्यात आली होती.
BGMI गेमिंग अॅप साईज :
या गेमिंग अॅपची साईज जवळपास 2GB इतकी आहे. या अॅपला मोबाईलच्या डेटावरून डाउनलोड करतान अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमचा मोबाईल WiFi शी कनेक्ट करून गेम डाउनलोड करू शकता. याचं कारण गेमची साईज मोठी आहे. मोबाईल डेटा पॅकसाठी मर्यादा आहेत. त्यामुळे डाउनलोड करताना अडचणीचे ठरू शकते.
जुन्या यूजर्सनी असं करा अकाउंट कंटिन्यू :
जर तुम्ही BGMI खेळाचे जुने अकाउंट होल्डर आहात आणि सोशल मीडिया अकाउंट्सच्या मदतीने लॉगिन करून अकाउंट पुन्हा सुरू करू शकता. तसेच 'इन क्रेडेंशियल'च्या मदतीने BGMI चा जुना डेटा पुन्हा प्राप्त करू शकता. हा डेटा मिळाल्यानंतर BGMI गेम तिथूनच सुरू करून खेळू शकता. जर तुम्ही हा जुना डेटा पुन्हा मिळविला नाही, तर तुम्हाला गेम नव्याने डाउनलोड करून खेळावं लागणार आहे.
BGMI साठी हे नवीन नियम :
भारत सरकारच्या आदेशातनंतर BGMI गेमिंग अॅप काही नियम आणि अटीसह लाँच करण्यात आले होते. हे नियम असे आहेत..
1. 18 वर्षाखालील कमी वयाच्या मुलांना दिवसभरात फक्त 3 तास गेम खेळता येणार आहे. यासोबत गेमध्ये लॉगिन करताना पालकांच्या परवानगीची लागेल.
2. 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या यूजर्सना दरदिवशी फक्त 6 तास गेम खेळता येणार आहे. यासाठी सरकारने अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला आहे.
3. मुलांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचा विचार करून सरकरने हे नियम आणि अटी घातल्या आहेत. या गेमचे मुलांना व्यसन लागू नये म्हणून सरकारने हे नियम लागू केले आहेत.
4. सध्या BGMI गेम तात्पुरत्या स्वरूपासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर भारत सरकारकडून 3 महिन्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
इतर बातम्या वाचा :
Download BGMI : आता BGMI गेमिंग अॅप पुन्हा खेळता येणार, पण यासाठी वेळेचं बंधन पाळावं लागणार