Download BGMI :आता BGMI गेमिंग अॅप पुन्हा खेळता येणार, पण यासाठी वेळेचं बंधन पाळावं लागणार
अनेक दिवसापासून BGMI गेमिंग अॅपची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता BGMI गेम खेळण्यासाठी प्ले स्टोरवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु यासोबत काही मर्यादाही घालून देण्यात आल्या आहेत.
Download BGMI : अनेक दिवसापासून बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (BGMI) खेळाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या युजर्सची अखेर प्रतिक्षा संपली आहे. साधारण तीन वर्षापूर्वी PUBGI खेळावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर साधारण दोन वर्षापूर्वी BGMI गेमिंग अॅपची निर्मिती करण्यात आली होती. आता भारतातील युजर्ससाठी BGMI डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता BGMI युजर्सना हा खेळ खेळता येणार आहे. या खेळाचा चांगला आनंद घेता यावा म्हणून युजर्ससाठी Krafton ने 2.5 या नवीन अपडेटची घोषणाही केली आहे. गेल्यावर्षी BGMI वर भारतात एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. यानंतर यामध्ये काही बदल करून पुन्हा एकदा युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आहे.
BGMI च्या नवीन व्हर्जनसाठी वेळेचं बंधन
नुकतचं BGMI कडून भारतीय युजर्ससाठी नवीन व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आहे. परंतु या नवीन व्हर्जनचा खेळ खेळण्यासाठी मर्यादा घालण्यात आल्या आहेत. आता BGMI खेळताना युजर्सना वेळेचं बंधन पाळावं लागणार आहे. तसेच 18 वर्षाखालील सर्व मुलांसाठी एक टाईम लिमिट सेट करण्यात आली आहे. यामुळे या मुलांना टाईम लिमिट संपल्यानंतर BGMI खेळू शकणार नाहीत. याविषयी Krafton ने सांगितले आहे की, आम्ही या खेळाला पूर्ण जबाबदारीने प्रोत्साहन देत आहोत. यामुळे 18 वर्षा खालील सर्व मुलांसाठी टाईम लिमिट 3 तास आहे, तर इतर BGMI युजर्ससाठी दिवसभरात 6 तास खेळ खेळता येणार आहे. याशिवाय अल्पवयीन मुलांसाठी खेळताना आई-वडिलांच्या परवानगीची आवश्यकता लागणार आहे.
BGMI गेमिंग अॅप असं करा डाउनलोड करा
तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलमध्ये प्ले स्टोरवर जाव लागेल. यानंतर BGMI असं सर्च करून अॅप डाउनलोड करू शकता. पण अजून तरी आयफोन युजर्ससाठी हे अॅप उपलब्ध होऊ शकले नाही. परंतु, आजपासून म्हणजे 29 मे रोजी आयफोन युजर्सना BGMI अॅपल प्लेस्टोरवरून डाऊनलोड करता येणार आहे. तसेच हे अॅप डाउनलोड केल्यानंतर युजर्सना 48 तासाची वाट पाहावी लागणार आहे. यानंतर सर्व युजर्सना BGMI खेळचा आनंद घेता येणार आहे.
इतर बातम्या वाचा :