Netflix New Feature : आता नेटफ्लिक्सवर चित्रपट शोधण्याची कटकट संपली, जाणून घ्या 'या' नविन फिचरविषयी
नेटफ्लिक्स यूजरकरता नेटफ्लिक्सने एक अनोखे फिचर आणले आहे. आता तुम्हाला चित्रपट शोधण्याची गरज भासणार नाही.
NETFLIX : नेटफ्लिक्स (Netflix) हे मनोरंजनाचं उत्तम साधन आहे. नेटफ्लिक्सवर बघत तुम्ही तासनतास बसून तुमचा वेळ घालवून तुमचं मनोरंजन करु शकता. आता यूजरकरता नेटफ्लिक्सने एक अनोखे फिचर आणले आहे. ज्याचा फायदा आता नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांना होणार आहे. त्यांना आता चित्रपट पाहण्याकरता तो शोधण्याची आवश्यकता भासणार नाही. Netflix ने Android आणि iOS साठी एक नवीन वैयक्तिकृत टॅब सादर केले आहे. "माय नेटफ्लिक्स" नावाचा हा टॅब वापरकर्त्यांना त्यांना काय पहायचे आहे ते निवडण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे. टॅब वापरकर्त्यांचा पाहण्याचा इतिहास, डाउनलोड आणि आवडते शो आणि चित्रपटांवर आधारित पर्याय सूचवेल.
कंपनीने काय सांगितलं?
ते सर्व वापरकर्ते जेवढे अधिक नेटफ्लिक्सशी संवाद साधतील आणि त्यांना जे आवडते ते शेअर करतील, त्यांना माय नेटफ्लिक्स टॅबवर त्या गोष्टी अधिक दिसतील. या महिन्याच्या सुरुवातीला, कंपनीने प्रोफाईल ट्रान्सफर फीचर अपडेट केले आहे. जेणे करून वापरकर्त्यांना त्यांचे प्रोफाईल सध्याच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करता येईल. प्रोफाइल ट्रान्सफर फिचर वापरकर्त्यांना त्यांच्या पर्सनलाइज रिकमेंडेशन, व्यूइंग हिस्ट्री, माय लिस्ट, सेव्ह गेम्स आणि इतर गोष्टी दुसर्या खात्यात ट्रांसफर करू देते. गेल्या आठवड्यात, स्ट्रीमिंग जायंटने जाहीर केले की त्यांनी भारतात पासवर्ड शेअर करणे थांबवले आहे आणि जे सदस्य त्यांचे खाते त्यांच्या घराबाहेर शेअर करत आहेत त्यांना सतर्क करण्यात आले होते.
तर असाच एक मोठा निर्णय Netflix काही दिवसांपूर्वी घेतला होता. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग फीचर लागू केले होते. ज्यामध्ये पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालण्यात आली होती. हे फिचर आता भारतात देखील लागू केले गेले आहे. त्यामुळे नेटफ्लिक्स युजर्स त्यांच्या घराबाहेरील लोकांसोबत नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर करू शकणार नाहीत. या रोलआउटसह, कंपनीने अनेक नियम आणि अटी जोडल्या आहेत. नेटफ्लिक्स अनेक दिवसांपासून पासवर्ड शेअरिंगला विरोध करत होती. कंपनीने अनेक भागांमध्ये पासवर्ड शेअर करणे बंद केले होते आणि त्यावर शुल्क आकारले होते. त्यामुळे जर तुम्ही पासवर्ड शेअर केला असेल तर तुम्हाला त्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल. 20 जुलैपासून कंपनीने भारतातील ग्राहकांनासाठी हा नियम लागू केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Netflix : नेटफ्लिक्सचा भारतीयांना दणका! आता पासवर्ड शेअरिंग बंद; कंपनीकडून नवीन नियम लागू