Cooler Grass : तुमच्या Air cooler मधून थंड हवा येत नाही? तर मग 'हा' उपाय करा; वातावरण होईल गारेगार
जर तुम्ही बातमीत सांगितलेल्या टीप्स वापरात आणल्या तर तुमच्या कुलरपासून थंड हवा मिळू शकते.
Air Cooler Grass : देशात उष्णतेचा पारा चांगल्याच वाढल्याचं दिसून येतं, त्यामुळे अंगाची लाहीलाही होतेय. त्यापासून बचावासाठी आपण घरामध्ये एसी, कुलर किंवा फॅनचा वापर करतोय. त्यातही एसी अनेकांना परवडणारा नसतो, त्यामुळे कुलरच्या वापरावर अनेकांचा भर असतो. पण अशा कडक ऊन्हाळ्यात तुम्हाला कुलरपासून थंड हवा मिळत नसेल, तर तुमच्या कुलरमध्ये काही तरी गडबड आहे असं समजून जा. त्यामुळे कुलरमध्ये काही बदल करणे आवश्यक असतं.
बहुतांश वेळा कुलर चांगला असूनही त्याच्यापासून थंड हवा मिळत नाही. त्यामुळे नेमके काय बदल करायला हवेत, हे अनेक लोकांच्या लवकर लक्षात येत नाही. पण कधी कधी कुलरमध्ये गारवा देण्यासाठी वापरण्यात येणारं गवत खराब झाल्यामुळेही थंड हवा मिळत नाही. त्यामुळे तात्काळ कुलरचं गवत बदलून त्या ठिकाणी नवीन गवताचा वापर करायला हवा. तसं जर केल्यास तुम्हाला कुलरपासून थंड हवा मिळेल. यामुळे तुमची उष्णतेमुळे होणारी जीवाची काहिलीही दूर होईल.
तुमचं कुलरच्या गवत बदलायची वेळ आली आहे हे कसं ओळखाल? कुलरपासून थंड हवा मिळण्यासाठी त्यामध्ये अनेक गोष्टींचा वापर करण्यात येतो. पण इथे तुम्हाला कुलरच्या गवताशी संबंधित काही फॅक्ट सांगणार आहोत. जर तुम्ही बातमीत सांगितलेल्या टीप्स वापरात आणल्या तर गवत बदलल्यामुळे तुमच्या कुलरपासून थंड हवा मिळू शकते.
तुमच्या Air Cooler चं गवत खराब झाल्याचं कसं ओळखणार?
1. जर तुमच्या एअर कुलरमधून आंबट किंवा बुरशीचा वास येत असेल, तर गवत खराब झाल्याचा सिग्नल आहे.
2. तुमच्या कुलरचं गवत भुरकट किंवा काळपट होत असेल, तर ते गवत खराब झाल्याचं स्पष्ट आहे.
3. जर तुमच्या कुलरचं गवत चिकट लागत असेल, तर गवत पू्र्णत: खराब झालं आहे हे समजून घ्यावं. या गवताला लवकर बदलून टाका.
4. जर तुमच्या कुलरमध्ये गवतावर बुरशी लागल्याचं दिसत असेल, तर हे गवत तात्काळ बदलण्याची वेळ आली आहे.
5. जर कुलरचं गवत वारंवार ओलं केल्यानंतरही लवकर सुखत असेल, तर हे गवत खराब झाल्याचं सिग्नल आहे.
6. जर तुमचं एअर कुलर पूर्वीसारखं थंड हवा देत नसेल आणि तुम्हाला गवतावर धूळ, पाणी जमा होत असल्याचं दिसत असेल, तर गवत बदलण्याची वेळ आली आहे.
जर कुलरमध्ये वरील कोणत्याही प्रकारचे फॅक्टर दिसून येत असतील, तर तुमच्या कुलरचं गवत तात्काळ बदलण्याची आवश्यक आहे. या खराब गवतासह कुलरचा वापर केल्यामुळे सगळ्या घरामध्ये बुरशी आणि घातक बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य आजारी पडू शकतात. त्यामुळे एअर कुलरचा वापर करताना त्याच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या.