एक्स्प्लोर

कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या

सतीश मोटघरे असं सेतू केंद्र चालकाचं नावं असून भंडाऱ्याच्या लाखनी येथील सिंधी लाईन चौकात असलेल्या 'नेहा सेतू केंद्रा'वर एसीबीने ही कारवाई केली.

भंडारा : गरीब कामगाराच्या मुलाची शैक्षणिक कागदपत्र परत करण्यासाठी 11 हजार रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या 'नेहा सेतू केंद्रा'च्या संचालकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. शासकीय कामासाठी लागणारी मूळ कागदपत्रे चक्क ओलीस ठेवून पैशांची मागणी करणाऱ्या या सेतू केंद्र चालकावर कारवाई झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासन आणि इतर सेतू सुविधा केंद्रांच्या (Bhandara) कार्यक्षमतेवरही या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, सेतू सुविधा केंद्राकडून सातत्याने होणाऱ्या फसवणूक आणि लुटीबाबत अनेकदा पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो. 

सतीश मोटघरे असं सेतू केंद्र चालकाचं नावं असून भंडाऱ्याच्या लाखनी येथील सिंधी लाईन चौकात असलेल्या 'नेहा सेतू केंद्रा'वर एसीबीने ही कारवाई केली. तक्रारदार हे एक नोंदणीकृत बांधकाम कामगार असून त्यांनी 2021 मध्ये आपल्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी या सेतू केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरला होता. त्यावेळी संचालक सतीश मोटघरे याने विद्यार्थ्यांची दहावीची मार्कलिस्ट, डोमिसाईल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड अशी महत्त्वाची मूळ कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारदार आपली कागदपत्र परत मागण्यासाठी चकरा मारत होते, मात्र मोटघरे काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत होता. अखेर 30 जानेवारी रोजी त्यानं ही कागदपत्र परत करण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाखाली आणि स्वतःसाठी 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर तक्रारदाराकडून 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सतीश मोटघरे याला एसीबीच्या पथकानं पंचासमक्ष रंगेहाथ बेड्या ठोकल्या.

दरम्यान, या लाचप्रकरणामुळे शालेय शिक्षण व्यवस्था आणि कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेकदा सर्वसामान्य पालकांना, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांसाठी अडवणूक केली जाते. पैशांची अमाप मागणी करत विद्यार्थ्यांची लूट करण्यात येते. त्यामुळे, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी सेतू सुविधा केंद्र आणि महसूल विभागावर याबाबत कडक जरब ठेवणे आवश्यक आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baby Selling Case: छत्तीसगडमधील अल्पवयीन मुलीचे तरूणासोबत प्रेमसंबंध; डिलिव्हरी आली, डॉक्टरनं हेरलं अन् पैशांची मागणी, बाळविक्री प्रकरणातील डॉक्टरचा आणखी एक कारनामा आला समोर
छत्तीसगडमधील अल्पवयीन मुलीचे तरूणासोबत प्रेमसंबंध; डिलिव्हरी आली, डॉक्टरनं हेरलं अन् पैशांची मागणी, बाळविक्री प्रकरणातील डॉक्टरचा आणखी एक कारनामा आला समोर
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
Embed widget