Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत
मुंबई : अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली.
विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता का? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले. दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावाच, पण त्याचसोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेनेही करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली.



















