एक्स्प्लोर

Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला

Parbhani : खासदार संजय जाधव यांनी परभणी महापालिका निवडणुकीत काँग्रेस सोबत राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी केल्याचं देखील ते म्हणाले.

परभणी : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काय झालं याचा परिणाम परभणी महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर निवडीमध्ये होणार नाही, असं परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे. काँग्रेससोबत आमची अगोदरच युती होती आणि आताही युती कायम आहे. आम्हाला कुठलिही अडचण महापौर करण्यामध्ये येणार नसल्याचं खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे.  अजित पवार यांचा अपघात होण्यापूर्वी  25 तारखेला त्यांचा मला फोन आला होता, असंही संजय जाधव म्हणाले. 

संजय जाधव अजित पवार यांच्यासोबत झालेली चर्चा सांगताना म्हणाले की, मी त्यांनाही सांगितलं होतं की आम्हाला एकटे तुमच्यासोबत जाता येणार नाही, आपण काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आपण तिघे एकत्र बसू, मात्र त्यानंतर दुर्घटना घडली. परंतु,  त्यांची राष्ट्रवादी देखील आमच्या सोबत येऊ शकतात, अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली आहे.

चंद्रपूरचा परिणाम परभणीत होणार?

चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर झाला त्यामुळे आता परभणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर करण्यासाठी काँग्रेसची आवश्यकता आहे. याबाबत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विचारले असता त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडून काय आदेश येतो, त्यानंतर पाहू असे सांगितलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेना आणि काँग्रेस एकसंध आहे. परभणीत चंद्रपूरचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे.

परभणी शहर महानगर पालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक परवा म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे तत्पूर्वी कुठलाही दगाफटका बसू नये म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 25 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक हे सहलीवर गेले आहेत. दोन्ही पक्षांचे नगरसेवक मतदानाच्या दिवशी परभणीत दाखल होणार असल्याची माहिती आहे. 

दरम्यान, चंद्रपूरमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आम्ही देखील परभणीत आमच्या सोयीची भूमिका घ्यायची का असा सवाल विचारला आहे. आता परभणीत काय घडणार हे पाहावं लागणार आहे.  परभणी महापालिकेची सदस्यसंख्या 65 असून बहुमताचा आकडा 33 इतका आहे. आता परभणीत कोणाचा महापौर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

परभणी महापालिकेतील संख्याबळ: एकूण जागा 65

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : 25
काँग्रेस :12
भाजप :12
राष्ट्रवादी काँग्रेस :11
जनसुराज्य शक्ती :3
यशवंत सेना :1
इतर : 1

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget