एक्स्प्लोर

Apple : जून तिमाहीत Apple ने केली मोठी कमाई , ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली माहिती

Apple कंपनीने जून तिमाहीत विक्रमी कमाई केलेली आहे. Apple ने आतापर्यंत केलेल्या कमाईच्या अहवालात भारतीय बाजापेठांनी मोठी कामगिरी बजावली आहे.

Apple : फेमस Apple कंपनीने जून तिमाहीत विक्रमी कमाई केलेली आहे. अॅपलचे सीईओ (CEO) टिम कुक म्हणाले की, "जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपनीने केलेल्या कामगिरीबद्दल ते खूश आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, "भारतीय बाजारपेठांची क्षमता पाहता Apple ची विक्री मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे." 

Apple ने आत्तापर्यंत केलेल्या कमाईच्या अहवालात भारतीय बाजापेठांनी मोठी कामगिरी बजावली आहे. कंपनीने सांगितले की, "भारतात सुरू केलेल्या Apple स्टोअरची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे." भारतीय बाजारपेठांच्या क्षमतेद्दल टिम कुकला विचारले असता त्यांनी सांगितले की, "आम्ही जून तिमाहीत भारतात विक्रमी कमाई केली. आम्ही या तिमाहीत आमची पहिले दोन रिटेल स्टोअर्स देखील चालू केले आणि हे रिटेल स्टोअर (Retail Store) आता आमच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत."

कंपनीने सांगितले की, "Iphone खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आम्ही गुंतवणूक करत राहू आणि ग्राहकांना  अनेक आॅफर देऊ. भारतीय बाजारपेठ ही  जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्मार्टफोन मार्केट आहे आणि आम्ही तेथे खरोखर चांगले काम केले पाहिजे आणि आत्तापर्यंत झालेल्या आमच्या कमाईबद्दल आम्ही खूश आहोत. तर कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, या स्मार्टफोन मार्केटमध्ये त्यांचा हिस्सा अजूनही खूप कमी आहे, त्यामुळे अॅपलसाठी येथे मोठी संधी आहे.

भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्मार्टफोन मार्केट आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने मिड-सेगमेंट स्मार्टफोनचे वर्चस्व आहे. आणि आयफोन खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न आहे. त्यामुळे अॅपलचा बाजारातील हिस्सा वाढत आहे. सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालानुसार, अॅपलने 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत स्मार्टफोन मार्केटमध्ये 61 टक्के वाढ नोंदवली आहे. मे महिन्यात, आयफोनच्या निर्यातीने विक्रमी रु. 10,000 कोटींचा टप्पा गाठला होता, ज्यामुळे त्या महिन्यात देशातून एकूण मोबाईल शिपमेंट रु. 12,000 कोटी झाली होती. भारतात अॅपलची वाढ चांगली होत असल्याचे उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सायबरमीडिया रिसर्चचा अंदाज आहे की या वर्षाच्या अखेरीस स्मार्टफोन मार्केटमध्ये Apple चा वाटा 7% च्या जवळपास असेल. तर अॅपलने आयफोनची जोरदार विक्री केलेल्या इतर बाजारपेठांमध्ये इंडोनेशिया, पोलंड, फिलीपिन्स, तुर्की, यूएई, मेक्सिको आणि सौदी अरेबिया यांचा देखील समावेश आहे

इतर महत्वाच्या बातम्या

iPhone 15 Series Launch Date : आयफोन 15 सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी होणार लॉन्च; 'ही' असतील खास वैशिष्ट्य

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget