(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Infinix Note 12i: नवीन फोन खरेदी करायचा आहे? फक्त दोन दिवसात लॉन्च होणार आहे Infinix चा सर्वात स्वस्त फोन
Infinix Note 12i: Infinix Note 12i: जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट कमी आहे, तर चिन्ह करू नका. फक्त दोन दिवसात एक जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन लॉन्च होणार आहे.
Infinix Note 12i: जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट कमी आहे, तर चिंता करू नका. फक्त दोन दिवसात एक जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. मोबाईल उत्पादक कंपनी Infinix आपला नवीन फोन बाजारात आणणार आहे. Infinix कंपनी 25 जानेवारी रोजी Infinix Note 12i लॉन्च करणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला 7GB पर्यंत RAM आणि 5000 Mah ची बॅटरी मिळेल. फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात...
Infinix Note 12i: किती असेल किंमत?
Infinix Infinix Note 12i स्मार्टफोनमध्ये (Upcoming Smartphones 2023) ग्राहकांना मजबूत बॅटरी, चांगला कॅमेरा आणि अधिक स्टोरेजचा पर्याय मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपयांपासून लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी Infinix Note 12i दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च करू शकते. ज्यामध्ये पहिला 4/64GB स्टोरेज आणि दुसरा 6/128GB स्टोरेज आहे.
Infinix Note 12i: स्पेसिफिकेशन
Infinix Note 12i मध्ये ग्राहकांना 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 60 hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन MediaTek Helio G85 प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 3 जीबी व्हर्च्युअल रॅमचा पर्याय मिळेल. म्हणजेच तुम्ही 7 GB पर्यंत रॅम वाढवू शकता. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, मोबाईल फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह (triple camera setup) येतो, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि एक AI लेन्स आहे. Infinix Note 12i मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी (Infinix Note 12i video calling) 8-मेगापिक्सेल कॅमेरा (Infinix Note 12i Camera) देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5000 Mah बॅटरीसह येतो. जो 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
Upcoming Smartphones 2023: हे स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च
जर तुम्ही नवीन वर्षात स्वतःसाठी प्रीमियम मोबाईल (Upcoming Smartphones 2023) फोन घेण्याचा विचार करत असाल तर लवकरच OnePlus आपला नवीन स्मार्टफोन oneplus11 5G बाजारात आणणार आहे. वनप्लस (oneplus) व्यतिरिक्त, सॅमसंग (samsung) लवकरच S23 सीरीजचे अनावरण करू शकते. या सीरीज अंतर्गत कंपनी 3 स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.
इतर महत्वाची बातमी: