एक्स्प्लोर

Aadhaar Card: आता फक्त आधार क्रमांकावरून देखील पैसे होतील ट्रान्सफर, ओटीपी किंवा पिनची गरज नाही, जाणून घ्या कसं...

Money Transfer by Aadhaar Card: देशातील प्रत्येक नागरिकाकडे आज आधार कार्ड आहे. तुम्ही आधार कार्डचा वापर फक्त ओळखपत्र म्हणूनच नाही, तर याच्या मदतीने तुम्ही पैसेही काढू शकता.

Money Transfer by Aadhaar Card: देशातील प्रत्येक नागरिकाकडे आज आधार कार्ड (Aadhaar Card) आहे. तुम्ही आधार कार्डचा वापर फक्त ओळखपत्र म्हणूनच नाही, तर आधार कार्डच्या मदतीने तुम्ही पैसेही काढू शकता. त्याचबरोबर आता तुम्ही फक्त आधार क्रमांकाच्या मदतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AePS) च्या मदतीने तुम्ही डिजिटल व्यवहार करू शकता. आधारच्या मदतीने तुम्ही कसे करू शकतात आर्थिक व्यवहार हे जाणून घेऊ...

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आधार क्रमांकाच्या मदतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली आधार क्रमांक, iris स्कॅन आणि फिंगरप्रिंटसह व्हेरिफिकेशन करून एटीएमद्वारे आर्थिक व्यवहारांना परवानगी देते. ही प्रणाली अतिशय सुरक्षित पर्याय समजली जाते. कारण त्यासाठी तुम्हाला बँक तपशील देण्याची आवश्यकता नाही.

Money Transfer by Aadhaar Card: आधार कार्ड बँकेशी लिंक करणे आवश्यक आहे

जर तुम्हाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card) बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. तुमचे खाते बँकेशी जोडलेले नसेल, तर तुम्ही या प्रणालीतून पैसे काढू शकणार नाही. या प्रणाली अंतर्गत, व्यवहार करण्यासाठी कोणत्याही ओटीपी आणि पिनची आवश्यकता नाही. एक आधार कार्ड अनेक बँक खात्यांशी जोडले जाऊ शकते.

Money Transfer by Aadhaar Card: AePS प्रणालीवर कोणत्या सेवा

AePS प्रणालीच्या मदतीने तुम्ही बँकेतून पैसे काढू शकता. यासोबतच बॅलन्स तपासणे, पैसे जमा करणे आणि आधार वरून निधी हस्तांतरित करणे इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय मिनी बँक स्टेटमेंट आणि eKYC द्वारे फिंगर डिटेक्शन इत्यादी सुविधा मिळू शकतात.

Money Transfer by Aadhaar Card: AePS प्रणाली कशी वापरायची?

  • तुमच्या क्षेत्रातील बँकिंग करस्पाँडंटकडे जा.
  • आता OPS मशिनमध्ये 12 अंकी आधार क्रमांक टाका.
  • त्यानंतर पैसे काढणे, ठेव, केवायसी आणि शिल्लक चौकशी इ. यासारखी कोणतीही एक सेवा निवडा.
  • आता बँकेचे नाव आणि काढायची रक्कम टाका.
  • यानंतर बायोमेट्रिक व्यवहाराची व्हेरिफिकेशन करा, त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता.

इतर महत्वाची बातमी:

Sanjay Raut on Eknath Shinde: संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंच्या दावोसमधील 'त्या' भेटीची खिल्ली; म्हणाले, षण्मुखानंदबाहेर मला 'या' देशाचे पंतप्रधान भेटले...!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget