एक्स्प्लोर

How To Make Voter ID Online : मतदार नोंदणीसाठी मोदींचं तरुणांना आवाहन; कशी कराल ऑनलाईन मतदार नोंदणी? या स्टेप्स पाहा अन् आजच करा नोंदणी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. तर नव्या मतदारांना आता नाव नोंदणी (Voter ID Online) कशी करावी, असा प्रश्न पडला असेलच. जाणून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरं...

How To Make Voter ID Online : तरुणांनो तुम्ही देशाचं भवितव्य आहात. तुमची देशाला गरज आहे. मात्र तुम्ही जर मतदार नोंदणी केली नसेल तर लगेच करुन घ्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशाच्या तरुणांना केलंं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिमधील राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्धाटन केलं. त्यावेळी त्यांनी तरुणांना कानमंत्रही दिले. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन त्यांनी दिलं आहे. तर नव्या मतदारांना आता नाव नोंदणी (Voter ID Online) कशी करावी, असा प्रश्न पडला असेलच. त्यामुळे जाणून घेऊया सर्व प्रश्नांची उत्तरं...

ऑफिसेसच्या फेऱ्या विसरा अन् ऑनलाईन अर्ज करा...

भारतातील कोणत्याही नागरिकाने वयाची 18 वर्षे पूर्ण केली की त्याला मतदानाचा हक्क प्राप्त होतो.माभारत लोकशाहीचा देश असल्याकारणाने इथं मतदान आला अधिक महत्त्व दिले जाते. 18 वर्षे पूर्ण झाली की मतदाराने मतदार यादीत नोंदणी केल्यावर त्याचं नाव कायमस्वरूपी मतदार यादीत जोडले जाते. पण या यादीमध्ये तुमचं नाव नोंदवण्याकरता तुम्ही बुथवर गेला तर तुम्हाला सगळी कागदपत्रे घेऊन जावी लागतात. अशावेळी तुमची गडबड उडते आणि एका कामासाठी चार-पाच वेळा फेऱ्या माराव्या लागतात. परंतु हाच त्रास कमी व्हावा आणि या डिजिटल युगामध्ये सगळी काम घरबसल्या करता यावेत यासाठी भारत सरकारने वोटर हेल्पलाईन ॲप नावाचं एप्लीकेशन सुरू केले आहे. याचा वापर करून तुम्ही घरबसल्या तुमचं नाव मतदार यादी मध्ये नोंदवू शकतात. मात्र हा ॲप नेमका कोणता आहे आणि तो कशाप्रकारे वापरतात याबाबत तुम्हाला देखील अनेक प्रश्न आहेत का? चला तर जाणून घेऊया या विषयक सविस्तर माहिती. 

Voter helpline app - 

अठरा वर्षे पूर्ण झालेले भारतातील सर्व नागरिक मतदान कार्यासाठी अर्ज करू शकतात. हे मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमच्याकडे फक्त तुमचे आधार कार्ड असेल आणि तुमचं वय 18 वर्षे पूर्ण असेल तर तुम्ही वोटर हेल्पलाइन ॲपवर जाऊन अवघ्या काही मिनिटात मतदान कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.यामुळे तुमचा वेळही वाचेल कष्टही वाचतील आणि पैसे देखील वाचतील. 

मतदान कार्डची नोंदणी कशी करावी 


1) सगळ्यात पहिल्यांदा गुगल प्ले स्टोअर ओपन करा, तिथे सर्च ऑप्शनवर जाऊन Voter helpline App डाऊनलोड करा. 
2)ॲप इन्स्टॉल झाल्यावर तुमच्या समोर डिक्सक्लेमर विषयक सगळी माहिती दिसू लागेल. त्यात असलेल्या आय ॲग्रीवर टिक करून नेक्स्ट बटनवर क्लिक करा. 
3)नंतर तुम्हाला तुमची भाषा निवडण्याचा ऑप्शन येईल. तुमच्या सोयीनुसार ती भाषा निवडा. 
4) एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन नावाचे बटन असेल. त्यावर क्लिक करा. 
5)आता तुमच्यासमोर वेगवेगळ्या फॉर्मची लिस्ट दिसेल त्याच्यातील न्यू वोटर रजिस्ट्रेशन (form 6) वर क्लिक करा. हाच फॉर्म नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या माणसांसाठी वापरला जातो. 
6)लेट्स स्टार्ट वर क्लिक करून याच्यापुढे येणाऱ्या पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाका. 
7 ) नंतर सेंट OTP असं ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईल मध्ये एक OTP येईल तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाका आणि व्हेरिफाय OTP या बटन वर क्लिक करा.
8) आता तुमच्या समोर दोन पर्याय असतील -1) Yes, I am applying for the first time. 2) no,I already have voter ID. 
जर तुम्ही पहिल्यांदाच यासाठी अर्ज करत असाल तर पहिल्या ऑप्शन वर क्लिक करा आणि जर तुमच्याकडे तुमचं आयडी कार्ड असेल तर तुम्ही दुसऱ्या ऑप्शन वर क्लिक करा
9)तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये दिलेली सगळी माहिती भरा. यात राज्य, जिल्हा ,विधानसभा मतदारसंघ तसेच तुमचा आधार कार्ड नंबर देखील टाका . 
10)यानंतर खाली स्क्रोल केल्यावर एक कॅलेंडर येईल ज्यात तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडायचे असेल. आणि तुमचा जन्माचा पुरावा म्हणून डॉक्युमेंट अपलोड करा. यात तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड ,जन्माचा दाखला याच्यातील काही अपलोड करू शकतात. 
11)यानंतर येणाऱ्या पेज मध्ये तुमचा फोटो अपलोड करा हा फोटो मतदान कार्ड वर छापून येईल. 
12)त्याच्या खाली स्क्रोल करून तुमचे लिंग त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, आडनाव भरा. त्यात मोबाईल नंबर, ईमेल टाईप करा. नेक्स्ट बटन वर क्लिक करा. 
13)आता ज्या व्यक्तीकडे आधीपासून मतदान कार्ड आहे अशा तुमच्या जवळच्या व्यक्तीची तुम्हाला तेथे माहिती द्यावी लागेल.
14) आता तुमच्याकडे एपीआयसी (EPIC)नंबर मागतील.म्हणजे त्या व्यक्तीचा मतदान कार्ड नंबर.
15)नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर येणारा पेज मध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता टाकावा लागेल.आणि ऍड्रेस प्रुफ मध्ये आधार कार्ड हा ऑप्शन निवडा आणि आधार कार्ड अपलोड करा. 
16)त्याचा शेवटचा टप्पा म्हणजे डिक्लेरेशनचा भाग. त्यात तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा ,गाव निवडावे लागेल. तुम्ही मेन्शन केलेल्या पत्त्यावर तुम्ही कधीपासून राहता ते वर्ष महिने हे सिलेक्ट करावे लागेल. तुमचे नाव आणि सध्याचे राहते ठिकाण टाका. 
17)आता done या ऑप्शनवर क्लिक करा.तुम्हाला आता पूर्ण माहिती भरलेली दिसेल आणि   पाच मिनिटांचा वेळ दिला जाईल, या पाच मिनिटांमध्ये तुम्ही सगळी तुमची माहिती पुन्हा एकदा चेक करायची आहे आणि कन्फर्म बटणावर क्लिक करायचे आहे. 
18)अशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा सबमिट होईल आणि तुम्हाला एक रेफरन्स आयडी दिला जाईल तो तुम्ही सेव्ह करून ठेवा. 
19)होम पेजवर येऊन तुम्ही तुमच्या मतदार कार्ड स्टेटस चेक करू शकतात. यासाठी राइट साईडमध्ये असलेले एक्सप्लोर बटन यावर क्लिक करा आणि नंतर स्टेटस ऑफ एप्लीकेशनऑप्शन वर क्लिक करा. यात तुम्हाला मिळालेला रेफरन्स आयडी टाकून तुम्ही तुमचा मतदान कार्डचा स्टेटस चेक करू शकता. 


एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वोटर आयडीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. आजच्या डिजिटल युगामध्ये हे तुमच्यासाठी खूप सोयीस्कर पद्धत ठरू शकते. अर्ज केल्यानंतर 15 ते 30 दिवसांमध्ये तुमची कागदपत्रांची तपासणी होते आणि तुमचे मतदान कार्ड तयार झाल्याचा तुम्हाला मोबाईलवर मेसेज येतो. तुमच्या डॅशबोर्ड वर हे कार्ड तयार झाल्यानंतर तुम्ही त्याची डिजिटल कॉपी डाऊनलोड करू शकता. तुम्हाला मिळणारे तुमचे ऑफलाइन कार्ड हे येत्या तीन ते सहा महिन्यात तुमच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाईल. 

इतर महत्वाची बातमी-

Republic Day parade : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ संचलन सोहळ्याचं बुकिंग सुरु; कुठे आणि कसं करणार बुकींग, संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget