![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Instagram Hack : Instagram Accound हॅक झालंय हे कसं ओळखाल? 'या' स्टेप्स फॉलो करा
अनेकांचे Instagram आकाऊंट हॅक करुन त्याचा वापर करुन गैरकाम करण्यात येतं. त्यामुळे तुमचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे की नाही हे तुम्ही कसं शोधू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
![Instagram Hack : Instagram Accound हॅक झालंय हे कसं ओळखाल? 'या' स्टेप्स फॉलो करा how to check if your instagram account is hacked or not Instagram Hack : Instagram Accound हॅक झालंय हे कसं ओळखाल? 'या' स्टेप्स फॉलो करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/c06a2aea6411fed4c4ae76164bd6affa1701774317704442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Instagram Hack : सध्या सगळेच मोठ्या प्रमाणावर इंस्टाग्राम(instagram) वापरत असतात. त्यासोबतच सायबर फ्रॉडदेखील पुढे येत असतात. अनेकांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होत असतात. त्यानंतर आपली माहितीदेखील लीक होऊ शकते. अनेकदा फेक अकाऊंट तयार केले जातात. त्यावरुन अनेकांना रिक्वेस्ट आणि मेसेजच पाठवले जातात. अनेकांचे आकाऊंट हॅक करुन त्याचा वापर करुन गैरकाम करण्यात येतं. त्यामुळे तुमचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे की नाही हे तुम्ही कसं शोधू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
खालील स्टेप्स फॉलो करा...
-मेटाचे इन्स्टाग्राम हे जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स रिल्स, व्हिडिओ, पोस्ट, स्टोरीज या गोष्टी एकमेकांशी शेअर करू शकतात. युट्युबप्रमाणेच आता या अॅपमधूनही लोक चांगले पैसे कमवत आहेत. हॅक झालंकी नाही पाहण्यासाठी तुम्हाला अॅपच्या आतील प्रोफाईलमध्ये जाऊन सेटिंग्स अँड प्रायव्हसीमध्ये जाऊन अकाउंट सेंटरवर क्लिक करावं लागेल.
-त्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि सिक्युरिटीवर क्लिक करावे लागेल आणि सिक्युरिटी चेक अंतर्गत Where you log in या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
-या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमचं अकाऊंट कुठे उघडलं आहे हे दिसेल. या लिस्टमध्ये तुम्हाला एखादे अनोळखी डिव्हाइस दिसले तर त्या डिव्हाइसमधून अकाऊंट लॉग आऊट करा आणि पासवर्डही बदला.
-या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमचं अकाऊंट कुठे ओपन आहे हे दिसेल. या लिस्टमध्ये तुम्हाला एखादे अनोळखी डिव्हाइस दिसले तर त्या डिव्हाइसमधून अकाऊंट लॉग आऊट करा आणि पासवर्डही बदला.
-अतिरिक्त सुरक्षा म्हणून, आपल्या खात्याचा 2 FA चालू ठेवा. असे होईल की जेव्हा जेव्हा आपण आपल्या खात्यात लॉगिन कराल तेव्हा आपल्याला एक अतिरिक्त पासवर्ड टाकावा लागेल जो आपल्या मोबाइल नंबरवर येईल.
इंस्टाग्रामवरुन रिल्स कसे डाऊलनोड कराल?
इन्स्टाग्रामकडून आता पब्लिक रील डाऊनलोड करण्याची परवानगी मिळाली आहे. इन्स्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी यांनी घोषणा केली आहे, आपण जागतिक स्तरावरील सार्वजनिक रील त्यांच्या अकाऊंटवरून डाउनलोड करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे डाउनलोड केलेल्या रील्स थेट कॅमेरा रोलमध्ये किंवा गॅलरीत येतील. हे फीचर सुरुवातीला जूनमध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले होते पण आता डाऊनलोडचा पर्याय पब्लिक रील्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हे फीचर आयओएस तसेच अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध असेल.त्यामुळे आता आपल्याचा हवं ते रील डाऊनलोड करता येणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)