(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UPI Tap And Pay : QR कोडला सुट्टी मिळणार! UPI टॅप अँड पे सेवा जानेवारीत सुरू होणार, जाणून घ्या कसे काम करेल?
डिजिटल इंडियाच्या या युगात आपण प्रत्येक लहान-मोठे पेमेंट युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय ) मधून करतो, दहा रुपयांचा चहा प्यायल्यानंतर त्याचे पैसे ही यूपीआय अॅपवरून देतो.
UPI Tap And Pay : डिजिटल इंडियाच्या या युगात आपण प्रत्येक लहान-मोठे पेमेंट युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) मधून करतो, दहा रुपयांचा चहा प्यायल्यानंतर त्याचे पैसे ही यूपीआय अॅपवरून देतो. मात्र, काही वेळा एवढ्या छोट्या पेमेंटदरम्यान यूपीआय अॅप ओपन करून मग पिन टाकणे थोडे अवघड जाते. त्यामुळेच आता असे पेमेंट करणं आणखी सोपं होणार आहेत. लवकरच यूपीआयचे एक फिचर लाँच होणार आहे, जे एका झटक्यात पेमेंट करेल. या फिचरला टॅप अँड पे असे नाव देण्यात आले आहे.
पैसे कसे दिले जातील?
टॅप आणि चॅट फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फोन टॅप करून कोणतेही छोटे पेमेंट पूर्ण करू शकता. म्हणजे चहाच्या गाडीवर पैसे द्यायचे असतील तर अॅप उघडण्याची किंवा पासवर्ड टाकण्याची गरज नाही, फक्त आपला फोन स्कॅनरसमोर घेऊन पेमेंट करावे लागेल. आपण आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे मशीनवर टॅप करून ज्या प्रकारे पैसे देता त्याच प्रकारे हे कार्य करेल.
त्यासाठी किती वेळ लागेल?
नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) यूपीआय टॅप अँड पे सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. 31 जानेवारी 2024 पर्यंत हे फीचर लाँच केले जाऊ शकते. सध्या पेटीएम, भीम अॅप आणि गुगल पे सारख्या काही यूपीआय अॅप्सवर निवडक युजर्सना ही सुविधा दिली जात आहे. हे फीचर वापरण्यासाठी युजर्सच्या मोबाइलमध्ये नियर फिल्टर कम्युनिकेशन अर्थात एनएफसी टेक्नॉलॉजी असणं गरजेचं आहे.
पेमेंटवर मर्यादा असेल
यूपीआय लाइट किंवा टॅप अँड पे फीचरच्या माध्यमातून तुम्ही मोठे पेमेंट करू शकणार नाही. जर तुम्हाला 500 रुपयांपेक्षा जास्त पैसे भरायचे असतील तर तुम्हाला तुमचा यूपीआय पिन टाकावा लागेल. टॅप अँड पे फीचरद्वारे तुम्ही फक्त 500 रुपयांपर्यंतच पेमेंट करू शकता. म्हणजे किराणा दुकान, चहाटपरी किंवा तत्सम छोट्या छोट्या गरजा डोळ्यांच्या झटक्यात भरल्या जातील.
यूपीआय खातं बंद होणार
जर तुम्ही यूपीआय ॲप्स वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जीपे (Google pay), पेटीएम (paytm), फोनपे(Phone pay)आणि भारतपे (Bharat Pe) सारख्या सर्व यूपीआय पेमेंट ॲप्सना इनॲक्टिव्ह युपीआय खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी गेल्या वर्षभरापासून यूपीआय आयडीचा वापर केला नाही त्यांची यूपीआय खाती बंद करण्यात येणार आहेत. 31 डिसेंबरनंतर सर्व कंपन्या अशी खाती बंद करण्यास सुरुवात करणार आहे.
इतर महत्वाची बातमी-