(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LG AI Robot : फिरायला गेल्यावर घराची चिंता विसरा; LG ने तयार केला एआय होम असिस्टंट रोबोट; घरातील पाळीव प्राण्यावरही ठेवणार लक्ष!
LG कंपनी दिवसेंदिवस चांगले प्रयोग करताना दिसत आहे. त्यातच आता त्यांनी एक खास रोबोट तयार केलं आहे. जे आपण घरी नसताना घराची देखभाल करेल आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर एखादा प्राणी पाळला असेल तर त्याचीदेखील काळजी घेणार आहे.
LG AI Robot : LG कंपनी दिवसेंदिवस चांगले प्रयोग करताना दिसत आहे. त्यातच आता त्यांनी एक खास रोबोट(ROBOT) तयार केलं आहे. जे रोबोट आपण घरी नसताना घराची देखभाल करेल आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर एखादा प्राणी पाळला असेल तर त्याचीदेखील तुम्ही नसताना काळजी घेणार आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींसाठी हे रोबोट खास ठरणार आहे. LG 2024 मध्ये आपलं होम असिस्टंट म्हणजेच LG AI Robot लाँच करण्याच्या तयारीत आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करुन सगळी कामं करणार असल्याचं बोललं जात आहे.
छोटा रोबोट फिरू शकतो, नवीन गोष्टी शिकू शकतो, लोक काय म्हणतात हे समजू शकतो, आपल्या अनुपस्थितीत आपल्या पाळीव प्राण्यांवर लक्ष ठेवू शकतो आणि संभाषण देखील करू शकतो, असा दावा केला जात आहे.
एलजीच्या एआय रोबोटमध्ये काय आहे खास?
एलजीचे म्हणणे आहे की त्यांचा एआय एजंट रोबोटिकवर काम करतो. हे एआय आणि मल्टी-मॉडेल टेक्नॉलॉजी येते आणि चालू देखील शकणार आहे. इतकंच नाही तर हा रोबोट शिकतोही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे एक सर्वांगीण होम मॅनेजर आहे. या डिव्हाइसच्या माध्यमातून युजर्सना झिरो लेबर होम देण्याची कंपनीची इच्छा आहे. म्हणजेच आता तुम्हाला घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही आहे.
हा रोबोट अतिशय अॅडव्हांस आहे. याला दोन पाय आहेत, त्यात लहान चाके बसवलेली आहे. त्यांच्या मदतीने रोबोट फिरू शकतो. एलजीचा एआय रोबोट आपल्या हालचालींच्या मदतीने लोकांशी संवाद साधू शकतो आणि भावनादेखील समजू शकतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मल्टी-मोडल एआय तंत्रज्ञान, व्हॉईस आणि इमेज रिकग्निशन तसेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या माध्यमातून गोष्टी समजू शकतात.
घरी नसल्यावर उपयोगी
जेव्हा आपण घरी नसता तेव्हा खिडकी उघडी आहे की दिवे चालू आहेत हे तपासून ते फिरू शकते. हे वापरल्या जात नसलेल्या गोष्टी बंद करून वीज वाचविण्यास देखील मदत करू शकते. जेव्हा आपण घरी परतता तेव्हा ते आपले स्वागत करते, आपला मूड समजून आणि गाणी वाजवू शकते किंवा आपल्याला बरं वाटण्यासाठी इतरही गोष्टी करू शकते. तातडीच्या कामांची आठवण करून देणे यासारख्या दैनंदिन कामांमध्ये देखील मदत करतं.
इतर महत्वाची बातमी-