Republic Day Doodle : Black And White Tv ते SmartPhone; प्रजासत्ताक दिनी गुगल डुडलमध्ये बदलत्या Technology चं दर्शन
Republic Day Doodle : सर्च इंजिन गुगलने भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त(Republic Day ) एक खास डुडल तयार केले आहे, ज्यात देशाचा अॅनालॉग टेलिव्हिजन पासून स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
Republic Day Doodle : सर्च इंजिन गुगलने भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त(Republic Day ) एक खास डुडल तयार केले आहे, ज्यात देशाचा अॅनालॉग टेलिव्हिजन पासून स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. डुडल हा एक प्रकारचा स्केच आहे. जो सर्वात मोठ्या घटना किंवा विषयांचे सोप्या पद्धतनीने सगळ्यांसमोर मांडत आहे.
गेल्या काही दशकांत राजधानीतील प्रजासत्ताक दिनाची परेड कशी पडद्यावर दिसली हे दाखवण्याचा प्रयत्न आजच्या गुगल डूडलमध्ये करण्यात आला आहे. 1947 मध्ये ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला.
गेल्या काही वर्षांत आपण कॅथोड रे ट्यूब असलेल्या मोठ्या दूरचित्रवाणी संचांपासून छोट्या टीव्हीकडे आणि नंतर स्मार्टफोनकडे वळलो आहोत. डूडलमध्ये दोन टीव्ही संच आणि एक मोबाइल फोन दाखवण्यात आला असून डाव्या बाजूला पहिल्या अॅनालॉग टेलिव्हिजन संचाच्या वर गुगलचे 'जी' लिहिलेले आहे आणि दोन टीव्ही स्क्रीनदोन 'O' अक्षरे म्हणून दर्शविली आहेत.
उजवीकडे दाखवलेल्या मोबाइल हँडसेटच्या स्क्रीनवर 'G', 'L' आणि 'E' ही तीन इंग्रजी अक्षरे लिहिलेली असतात. पहिल्या टीव्ही स्क्रीनवर परेडमधील एक दृश्य ब्लॅक अँड व्हाईट रंगात दाखवण्यात आले आहे, तर दुसऱ्या रंगीत स्क्रीनवर तंत्रज्ञानाचा प्रवास दर्शविणारी उंटाची सवारी दाखवण्यात आली आहे.या डूडलमध्ये 1950 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आहे आणि देशाने स्वत:ला सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक म्हणून घोषित केले त्या दिवसाची आठवण करून देण्यात आली आहे.
चित्ररथातदेखील देशातील संस्कृतीचं दर्शन
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथातशिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यात येणार आहे. "भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान - छत्रपती शिवाजी महाराज" या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे.सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्तव्यपथावरील संचलनात हा चित्ररथ सामिल करून घेण्याकरता विशेष प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त हौणाऱ्या संचलनात सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथही सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सादर केला जाणार आहे.
सन 2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली चित्ररथ संचलनात 28 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी या दोन संकल्पनांवरती विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते. यास अनुसरून विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350 वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शिवराज्याभिषेकाचा 350 वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून "लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज" या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते.
इतर महत्वाची बातमी-