एक्स्प्लोर

Google Doodle: गूगलचं खास डूडल; आता तुम्हीही बनवू शकता लोकप्रिय 'बबल टी'

गूगलनं (Google Doodle) आज 'बबल टी' चं एक खास डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. या डूडलमध्ये तैवानचा फॉर्मोसन माउंटन डॉग (Taiwanese Formosan Mountain Dog) देखील दिसत आहे.

Google Doodle: टँगी, फ्रुटी, स्विट आणि मिल्की अशा फ्लेवर्सचा 'बबल टी' (Bubble Tea) प्यायला अनेकांना आवडतो. बबल टी हा बोबा टी (Boba Tea) आणि पर्ल मिल्क टी (Pearl Milk Tea) या नावानं देखील ओळखला जातो. फ्रुट जेली किंवा टॅपिओकाने 'बबल टी'मधील बबल बॉल तयार केले जातात. बबल टीने जागतिक स्तरावर इतकी लोकप्रियता मिळवली की, 30 जानेवारी 2020 रोजी 'बबल टी' ला अधिकृतपणे 'न्यू इमोजी' म्हणून घोषित करण्यात आले. म्हणून गूगलनं आज 'बबल टी'चं एक खास डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. या डूडलमध्ये तैवानचा फॉर्मोसन माउंटन डॉग (Taiwanese Formosan Mountain Dog) देखील दिसत आहे. गूगल डूडलच्या ट्विटर अकाऊंटवर या डूडलची माहिती देण्यात आली आहे. 

गूगलचं खास डूडल

बबल टीच्या खास गूगल डूडलच्या माध्यमातून तुम्ही बबल टी तयार करू शकता. यासाठी तुम्हाला गूगल डूडलवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला एक व्हिडीओ दिसेल. त्या व्हिडीओमध्ये फॉर्मोसन माउंटन डॉग आणि त्याचे टी शॉप तुम्हाला दिसेल. त्यानंतर फॉर्मोसन माउंटन डॉगच्या टी शॉपमध्ये येणाऱ्यांसाठी तुम्हाला बबल टी तयार करायची आहे. हे टी शॉप बंद होण्यापूर्वी तुम्हाला पाच ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी स्क्रिनवर येणाऱ्या साहित्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल, त्यानंतर तुमचा बबल टी तयार होईल.

गूगलनं बबल टीच्या डूडलचा मेकिंग व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये बबल टीचं डूडल कसं तयार झालं? हे दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये गूगल डूडलचं डिझाइन दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ: 

बबल टी टॅपिओका बॉल्सपासून बनविला जातो. हे टॅपिओका बॉल्स साबुदाण्यासारखे असतात. त्यांना सुमारे 20 मिनिटे पाण्यात शिजवावे लागते, नंतर त्यांना दुधाच्या चहामध्ये टाकून त्यात  बर्फाचे तुकडे टाकावे लागतात. या थंड पेयाची चव गोड असते.

महत्वाच्या इतर बातम्या :

Republic Day 2023: 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलचं खास डूडल; पाहा गुजरातच्या कलाकाराची कला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget