(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Republic Day 2023: 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलचं खास डूडल; पाहा गुजरातच्या कलाकाराची कला
प्रजासत्ताक (Republic Day) दिननिमित्त गूगलनं खास डूडल (Google Doodle) तयार केलं आहे. सर्च इंजिन गूगलनं हे डूडल तयार करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Republic Day 2023: आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जात आहे. देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. आज देशातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. प्रजासत्ताक दिननिमित्त गूगलनं खास डूडल तयार (Google Doodle) केलं आहे. सर्च इंजिन गूगलनं हे डूडल तयार करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घ्या या खास गूगल डूडलबाबत...
गूगलच्या या खास डूडलमध्ये एक हातानं डिझाइन केलेलं पेपरकट आर्टवर्क दिसत आहे. हे आर्ट वर्क गुजरातच्या गेस्ट आर्टिस्टनं तयार केलं आहे. हे पेपरकट आर्ट तयार करणाऱ्या कलाकाराचं नाव पार्थ कोथेकर असं आहे. पार्थनं तयार केलेल्या या पेपरकट आर्टवर्कमध्ये इंडिया गेट, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, सीआरपीएफची मार्चिंग तुकडी आदी दिसत आहे. हे गूगल डूडल डिझाइन केल्यानंतर पार्थ कोथेकरनं त्याच्या भावना व्यक्त केल्या.
Happy Republic Day, India! Go behind the scenes to see how guest artist @parthkothekar creates mesmerizing and complex paper cutouts like the one in today’s #GoogleDoodle → https://t.co/uEzr2B6iaehttps://t.co/vJPvt1vghj pic.twitter.com/jKEV36c9TT
— Google Doodles (@GoogleDoodles) January 25, 2023
'जेव्हा तुम्हाला या डूडलवर काम करण्यासाठी संधी तुला मिळाली तेव्हा तुझी रिअॅक्शन कशी होती?' असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये पार्थला विचारण्यात आला. त्यावेळी पार्थनं उत्तर दिलं, 'माझ्या अंगावर शहारे आले. मी अनेक वेळा गूगलचा ईमेल वाचला कारण माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर मी माझ्या आई आणि बहिणीला याबद्दल माहिती दिली. मला अशी संधी मिळेल असे वाटले नव्हते.'
पुढे पार्थला प्रश्न विचारण्यात आला की,'लोक तुझ्या डूडलमधून कोणता संदेश घेतील?' या प्रश्नाचं उत्तर देत पार्थ म्हणाला, 'हा पेपर कट पूर्ण होण्यासाठी मला चार दिवस लागले. एका दिवसात मी सहा तास काम करत होतो. मला भारतातील कॉम्पेक्सिटी, त्यांचे परस्परांशी जोडले पैलू दाखवायचे होते, याची झलक कलाकृतीच्या कॉम्पेक्सिटीमधून (complexity) दर्शकांना पहायला मिळेल, अशी मला आशा आहे. '
पार्थनं तयार केलेल्या या आर्टवर्कचा मेकिंग व्हिडीओ गूगलनं त्यांच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पार्थ हा गूगलच्या डूडलसाठी आर्टवर्क तयार करताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Republic Day 2023 : आज 74 वा प्रजासत्ताक दिन, देशभर उत्साहाचं वातावरण; विविध कार्यक्रमांचं आयोजन