Tips for using Geyser : बॉम्बसारखा फुटू शकतो तुमचा गिझर; चुकूनही करू नका 'या' तीन गोष्टी
Tips for Using Geyser : अनेक वेळा गिझरमध्ये स्फोट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
Tips for Using Geyser : आता हिवाळा सुरू झाला आहे. अनेकजण थंडीत आंघोळीसाठी थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने आंघोळ करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच हिवाळ्याच्या काळात गिझरचा सर्वाधिक वापर केला जातो. पण एका चुकीमुळे तुमचे मोठे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे गिझर वापरताना खूप सावध राहण्याची गरज आहे. अनेक वेळा गिझरमध्ये स्फोट झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
गिझर सतत सुरू ठेवणे
गिझर वापरल्यानंतर ते बंद करणे देखील तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक वेळा गिझरमधील ऑटो कट सपोर्टमुळे आपण ते बंद करत नाही. यामुळे तुमचे नक्कीच नुकसान होऊ शकते. याशिवाय गिझरमध्ये स्फोट होण्याचाही धोका आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब गिझर बंद करणे फार महत्वाचे आहे. विशेषतः उन्हाळ्यात गिझर वापरत असाल तर ते नक्कीच लक्षात ठेवा.
वायरिंग तपासणी
गिझरच्या वायरिंगचीही वेळोवेळी तपासणी करावी. स्पार्किंगमुळे गिझरचेही नुकसान होऊ शकते. म्हणूनच, जेव्हा तुम्ही गिझर चालू करता किंवा एका हंगामानंतर, तेव्हा तुम्ही त्याचे वायरिंग तपासले पाहिजे. गिझरमुळे विजेच्या तारांवर खूप भार पडतो आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास उत्पादन खराब होऊ शकते.
सदोष उत्पादन
गिझर दुरुस्त करून घेणेही टाळावे. गिझरमधील काही घटक दुरुस्त करणे देखील धोकादायक असू शकते. गिझर खराब झाल्यास नवीन बसवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुमचा गिझर खूप वर्ष वापरला असेल तर तुम्ही अजिबात रिस्क घेऊ नये.
गिझरचा चांगला फायदा घेण्यासाठी योग्य पद्धतीने वापरणे गरजेचे आहे. गिझरबाबतची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. लहान मुले गिझर वापरत असतील तर, त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.