Fujifilm Instax : फक्त 90 सेकंद आणि फोटो तुमच्या हातात; आकर्षक लूक, भन्नाट कॅमेरा फीचर्ससह 'हा' कॅमेरा भारतात लॉन्च
Fujifilm Instax : फुजीफिल्म कॅमेरा ग्राहकांच्या चांगल्या अनुभवासाठी, फोटो फिल्टर इम्पॅक्टला अधिक चांगली गती देण्यासाठी आहे.
Fujifilm Instax : कॅमेरा (Camera) प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्यापैकी अनेक जण असे आहेत ज्यांना उत्कृष्ट दर्जाचे कॅमेरा वापरायला आवडतात. अशा लोकांसाठी Fujifilm India ने आपला FUJIFILM INSTAX MINI 99 इन्स्टंट कॅमेरा लॉन्च केला आहे. कंपनीने आगामी काळात फुजीफिल्म इन्स्टॅक्स रेंजमधील ॲनालॉग इन्स्टंट कॅमेऱ्यांमध्ये नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. फुजीफिल्म कॅमेरा ग्राहकांच्या चांगल्या अनुभवासाठी, फोटो फिल्टर इम्पॅक्टला अधिक चांगली गती देण्यासाठी असणार आहे. नवीन कॅमेऱ्यांमध्ये डिझायनर फिल्म आणि फोटो फिल्टरचा वापर केला जाईल. यामुळे सौंदर्यशास्त्र एका नवीन स्तरावर दिसेल. या कॅमेऱ्यात तुम्हाला कोणते नवीन फीचर्स मिळत आहेत आणि त्याची किंमत काय आहे याबद्दल येथे वाचा.
मिनी 99 कॅमेऱ्याची 'ही' आहे खासियत
Mini 99 ही जगभरातील लोकप्रिय Instax Mini 90 कॅमेराचं नवीन व्हर्जन आहे. यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासूनच नवीन फंक्शन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ज्यामुळे तुम्हाला फोटो प्रिंटिंगचा चांगला अनुभव मिळेल. मुद्रित अभिव्यक्ती पातळी सुधारण्यासाठी ॲनालॉग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
यात कलर इफेक्ट कंट्रोल आहे ज्यामध्ये 6 वेगवेगळ्या कलर एक्सप्रेशनसाठी वेगवेगळ्या कलरचा प्रकाश थेट फिल्मवर पडतो. यामध्ये तुम्हाला विंटेज मोड देखील मिळत आहे. या मोडसह, तुमच्या फोटोच्या कोपऱ्यावर एक हलकी काळी सावली पडते, ज्यामुळे फोटो विशेष होतो.
Fujifilm Instax Mini 99
तसेच, फोटोची प्रिंट अभिव्यक्ती शूटिंग स्थितीवर अवलंबून असते. लाइटिंग आणि शूटिंगवर अवलंबून प्रिंट एक्सप्रेशन बदलू शकते, वापरकर्ते जबरदस्त आकर्षक आणि अद्वितीय INSTAX प्रिंट तयार करू शकतात.
डिझाईन आणि आकार
कॅमेरा पकड, आकार आणि डिझाइन मजबूत आहे. हातात धरून ठेवल्यावर ते अतिशय उत्कृष्ट आणि प्रिमियम लुक देते आणि तुम्हाला कधीही, कुठेही क्षण सहज कॅप्चर करण्यास अनुमती देते.
मिनी 99 मध्ये उपलब्ध असलेल्या फंक्शन्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला त्यात कलर इफेक्ट कंट्रोल, विंटेज मोड आणि ब्राइटनेस कंट्रोल फीचर मिळते.
Mini 90 मध्ये आढळणारी फंक्शन्स देखील नवीन कॅमेऱ्यात देण्यात आली आहेत. यामध्ये लँडस्केप मोड, इनडोअर मोड 2 आणि मॅक्रोचा समावेश आहे. हे मोड तुम्हाला चांगली इमेज क्वालिटी देतात.
किंमत किती?
जर तुम्हाला हा कॅमेरा घ्यायचा असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल. कंपनीने आजपासून त्याचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. INSTAX MINI 99 कॅमेराच्या MRP बद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 20,999 रुपये आहे. हा मिनी कॅमेरा तुम्हाला 4 एप्रिलपासून Instax च्या अधिकृत वेबसाइट www.Instax.in आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाईन रिटेल स्टोअरवर उपलब्ध होईल.
सध्या बाजारात फुजीफिल्मचे अधिक कॅमेरे उपलब्ध आहेत. तुमचे बजेट 6 हजार रुपये असेल तर तुम्ही फुजीफिल्मचा हा कॅमेरा खरेदी करू शकता. तुम्हाला अतिशय कमी किमतीत Mini 11 कॅमेरा मिळत आहे. हा कॅमेरा तुम्हाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 25 टक्के सूटसह केवळ 5,999 रुपयांमध्ये मिळत आहे. यामध्ये तुम्हाला ब्लॅक, पर्पल, पिंक, ब्लू आणि व्हाईट असे 5 कलर ऑप्शन्स मिळत आहेत. तुम्हाला हा कॅमेरा Amazon वर 5,999 रुपयांना मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :