एक्स्प्लोर

चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी चीननं आणलं DeepSeek, अमेरिकेची झोप उडाली, AI जगात होणार मोठा बदल!

What is DeepSeek : चीनच्या कंपनीने चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी अगदी कमी पैशांत डीपसीक नावाचे एक चॅट बॉट आणले आहे. ज्याची अमेरिकेनेही धास्ती घेतली आहे.

What is DeepSeek : आजचे जग हे तंत्रज्ञानाचं जग आहे. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशीयल इंन्टेलिजन्सच्या येण्यानं तर तंत्रज्ञानात अद्भूत आणि विस्मयकारक बदल झाले आहेत. एआयच्या मदतीने एका तासात होणारे काम अवघ्या 5 मिनिटांत होत आहे. चॅट जिपीटी, मेटा एआय हे एआय जगतातील अग्रणी मानले जातात. मात्र या सर्वांचीच झोप उडवणारी एआय यंत्रणा चीनने आणली आहे. चीनन या यंत्रणेला डीपसिक (DeepSeek) असं नाव दिलंय. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान येताच आता चॅट जीपीटीसारख्या एआय यंत्रणांची झोप उडाली आहे. 

मेटा एआय, चॅट जीपीटीची झोप उडाली

चीनी एआय मॉडेल DeepSeek AI ने तंत्रज्ञानस्नेही तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्यांचे लक्ष स्वत:कडे ओढून घेतले आहे. अॅप स्टोअरवर तर या डीपसीकने  ओपन एआय या कंपनीच्या चॅट जीपीटीलाही मागे टाकलं आहे. डीपसीकने दिलेल्या सुविधांकडे संपूर्ण जग आकर्षित झाले असून चॅट जीपीटी, मेटा एआय या सारख्या कृत्रिम बुद्धीमत्तेवर काम करणाऱ्या प्लॅटफॉर्मसची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे चीनी कंपनीने विकसित केलेला हा डीपसीक एआय मंच तुम्हाला तुमच्या मोबाईल तसेच लॅपटॉपवरही वापरता येणार आहे. 

DeepSeek नेमकं काय आहे? 

मूळच्या चीनच्या कंपनीने तयार केलेले DeepSeek R1 हे एख ओपन सोअर्स एआय मॉडेल आहे. या एआय तंत्रज्ञानाचा परवाना सध्या मॅसाच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेकडे आहे. तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही अडचणींवर उत्तर शोधण्यासाठी हा एक खुला आणि मोफत असा मंच आहे. यावर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक तसेच कार्यालयीन समस्यांवर उत्तर शोधू शकतात. तुम्ही प्ले स्टोअरवरून तसेच आयओएस स्टोअरवरून हे अॅप इन्स्टॉल करू शकता.  

चीनला चिप देण्यास अमेरिकेची बंदी

DeepSeek या एआय चॅटबॉटवर 2023 साली काम करण्यास सुरुवात झाली. या कंपनीचे सीईओ लियांग वेनफेंग हे आहेत. ते याआधी हाय-फ्लायर नावाच्या हेज फंडचे संस्थापक होते. याच फंडाने DeepSeek ला आर्थिक पाठबळ पुरवलेले आहे. या कंपनीने 2022 साली Nvidia  या कंपनीकडून उच्च कार्यक्षमता असणार्‍या साधारण 10 हजार A100 ग्राफिक प्रोसेसर चिप खरेदी केल्या होत्या. याच चिपच्या मदतीने DeepSeek ने आपले पहिले एआय तंत्रज्ञान बाजारात आणले आहे. सध्या अमेरिकेने या चिप चिनला देण्यास बंदी घातली आहे. अमेरिकेने चिप पुरण्यास बंदी घातल्यानंतर डीपीसकने सध्या लॉन्च करण्यात आलेले एआय मॉडेल हे Nvidia  कंपनीच्या कमी कार्यक्षमता असलेल्या H800 चिपच्या मदतीने विकसित करण्यात आलेले असल्याचा दावा डीपसीक कंपनीने केला आहे. या कंपनीचा हा दावा म्हणजे अमेरिकेला एका प्रकारची चपराक असल्याचे म्हटले जात आहे.

डीपसीक चॅट जीपीटीला मागे टाकणार का?

मिळालेल्या माहितीनुसार DeepSeek एआय असिस्टन्टने डाऊनलोडिंगच्या बाबतीत ओपन एआयच्या चॅट जीपीटीला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे DeepSeek  तयार करण्यासाठी चॅट जीपीटीच्या तुलनेत फारच कमी पैसे लागल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, DeepSeek नेमकं काय काय काम करू शकते? तुमच्या कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते? हे अद्याप  सविस्तरपणे समजलेले नाही. येणाऱ्या काळात चॅट जीपीटीपेक्षा DeepSeek हे एआय चॅट बॉट किती वरचढ ठरणार? हे लवकरच समजणार आहे. 

हेही वाचा :

Suchir Balaji : ChatGPT विकसित करणाऱ्या Open AI वर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अवघ्या 26 वर्षीय भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत मृत्यू!

तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025Sushma Andhare on Holi | देवाभाऊ, देवतारी त्याला कोण मारी, अंधारेंकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget