ChatGPT : 'अशा' कोणत्या नोकऱ्या ज्याची AI जागा घेऊ शकत नाही? ChatGPT ने दिलं उत्तर
ChatGPT : AI ChatGPT लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आणेल असं लोकांचं म्हणणं आहे. यावर chatgpt ने उत्तर दिलं आहे.
ChatGPT : OpenAI च्या chatgpt या चॅटबॉटची प्रसिद्धी जगभर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सगळीकडे टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये AI चॅटबॉटची चर्चा सुरु आहे. याला प्रत्येकजण टेक्नॉलॉजी क्षेत्रातले भविष्य समजत आहे. पण हा चॅटबॉट नोकरी करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका असल्याचं अनेकांचं मत आहे. AI ChatGPT लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आणेल असं लोकांचं म्हणणं आहे. त्याच दरम्यान ChatGPT लोकांच्या नोकऱ्यांमध्ये मदत करेल असंही काही लोकांचं म्हणणं आहे.
तर, यावर chatgpt ने आपलं मत मांडलं आहे. chatgpt ने असं म्हटलं आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक गोष्टींची माहिती मिळते यामुळे अनेकांना आपली नोकरी धोक्यात आहे असं वाटणं साहजिक आहे. मात्र, chatgpt चा कोणाच्याही नोकऱ्या अडचणीत आणण्याचा विचार नाही. उलट, यामुळे अनेकांना रोजगार देण्याचा विचार करत आहे.
या ठिकाणी chatgpt ला कोणते जॉब रिप्लेस करू शकत नाहीत असा प्रश्न विचारला असता, chatgpt ने यावर उत्तर दिलं आहे.
समाजसेवा : समाजसेवा (Social Worker) ही अशी नोकरी आहे ज्यामध्ये तुमचं पूर्णपणे समर्पण, साहस, जिद्द आणि भावनिक भावना असणं गरजेचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जागा कधीही घेऊ शकणार नाही.
हेल्थकेअर प्रोफेशनल : या नोकरीमध्ये सहानुभूती, निर्णय घेण्याची क्षमता आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता असायला हवी.
शिक्षक : या प्रकारच्या नोकरीमध्ये अनेक कल्पकता, अनुकूलता, आणि मानवी संवाद असणं गरजेचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही नोकरी कधीच करू शकणार नाही.
कलाकार : कलाकार हा एक प्रकारचा छंद आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीमध्ये क्वचितच असतो. ज्या व्यक्तीला कलेचा छंद आहे त्याची कला मनापासून येते. त्यामुळे येथेही आर्टिफिशियल इंटेलिजन्स जागा घेऊ शकत नाही.
शास्त्रज्ञ : शास्त्रज्ञ हा अशा प्रकारचा जॉब आहे ज्यामध्ये तुमची कल्पकता, कोणतीची अडचण सोजविण्याची क्षमता असायला हवी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काम करत नाही.
वकील : वकिलाची नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे मुळात कायदेशीर ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तर्कशक्ती आणि निर्णयक्षमताही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे येथेही आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमची जागा घेऊ शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
ChatGPT ने बिल गेट्स आणि ऋषी सुनक यांची घेतली मुलाखत, विचारले 'हे' प्रश्न