एक्स्प्लोर

Call Forwarding Scam : चुकूनही *401# डायल करू नका; आयुष्यभराची कमाई पाण्यात गेलीच म्हणून समजा!

देशात सध्या सायबर भामट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सायबर भामट्यांपासून वाचण्यासाठी सरकारने देशातील करोडो मोबाईल फोन युजर्सना इशारा दिला आहे.

Call Forwarding Scam : देशात सध्या सायबर भामट्यांनी चांगलाच धुमाकूळ (cyber crime) घातला आहे. या सायबर भामट्यांपासून वाचण्यासाठी सरकारने देशातील करोडो मोबाईल फोन युजर्सना इशारा दिला आहे. दूरसंचार विभागाने युजर्सना काही कॉलपासून सावध राहण्यास सांगितले आहे .  'स्टार 401 हॅशटॅग' (*401#) डायल करून सायबर भामटे युजरच्या मोबाईल नंबरवर कॉल करून OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड मागतात. हे कळलं की सायबर भामट्यांना युजर्सच्या सगळे कॉल फॉरवर्ड करण्याची परवानगी मिळते आणि नंतर सर्व डिटेल्स मिळवून बँक खाते रिकामे करतात . त्यामुळे सर्वांनाच सतर्क राहण्याचा सल्ला सायबर एक्सपर्ट देत आहेत. 

चुकूनही *401# डायल करू नका.

दूरसंचार विभागाने Airtel, Jio, Vodafone-Idea, BSNL च्या सर्व युजर्सना अशा इनकमिंग कॉल्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. या आधीही ऑक्टोबरमध्ये *401# कॉल फॉरवर्डिंग स्कॅमची प्रकरणे समोर आली आहेत. गुन्हेगार ऑनलाइन डिलिव्हरी, बँक किंवा इतर सेवांचे एजंट म्हणून सांगतात आणि युजर्सना या नंबरवर कॉल करण्यास सांगतात. युजर्स स्कॅमर्सच्या सापळ्यात अडकतात आणि हा विशेष USSD कोड टाकून, ते सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या अनोळखी नंबरवर त्यांच्या फोनवरील सर्व इनकमिंग कॉल्सना परवानगी देतात.

नेटवर्क अपग्रेडच्या नावाखाली फसवणूक

बँकिंग एजंट किंवा टेलिकॉम ऑपरेटर सपोर्ट असल्याची बतावणी करणारे सायबर गुन्हेगार युजर्सला कॉल करतात आणि नेटवर्क समस्या किंवा इतर कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी हा नंबर डायल करण्यास सांगतात. दूरसंचार विभागाने युजर्सना अशा कोणत्याही सर्व्हिस कॉलकडे दुर्लक्ष करण्यास आणि कॉल फॉरवर्डिंग केलेले नंबर वापरू नये, असे सांगितले आहे.

असे कॉल फॉरवर्ड करणे थांबवा!

1) जर युजर्स सायबर गुन्हेगारांना बळी पडले आणि कॉल फॉरवर्डिंग चालू झालेच तर त्यांना स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ते फॉरवर्डिंग कॉल त्वरित बंद करावे.

2) यासाठी यूजर्सला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.

3) यानंतर, तुम्ही कॉल सेटिंग्जमध्ये जाऊन कॉल फॉरवर्डिंग पर्याय वर जाऊन डिसेबल करू शकतात किंवा डीफॉल्ट सेटिंग्ज करू शकता.

सोशल मीडियावरील कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका

तुम्ही अनेकदा सोशल मीडिया वापरत वेगवेगले मेसेज येतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक्स दिलेल्या असतात आणि आपल्याला अनेक गोष्टींचे आमिष दाखवून त्या लिंकवर क्लिक करायला भाग पाडतात मात्र कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका, असं सायबर एक्सपर्ट कायम सांगत असतात. तरीही आपण सायबर भामट्यांनी दाखवलेल्या आमिषाला बळी पडतो आणि आपला खिसा खाली करुन घेत असतो. 

इतर महत्वाची बातमी-

Free Netflix : फ्रीमध्ये Netflix बघण्याचा भारी जुगाड! वाचतील तुमचे सबस्क्रीप्शनचे पैसे, जाणून घ्या ही कमाल ट्रिक्स!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
×
Embed widget