Fake E Challan Scam : ई-चलानचा एक मेसेज खिसा रिकामा करु शकतो, कसा ओळखाल फेक ई-चलान?
सायबर भामटे लोकांना चलान कापण्याचे मेसेज पाठवत आहेत आणि सापळ्यात अडकलेल्यांना लुटत आहेत. हा घोटाळा वाहनांच्या चालानशी संबंधित असून, त्याबाबत पोलिसांनी अलर्टही जारी केला आहे.
Fake E Challan Scam : सध्या सगळीकडे सायबर (Fake E Challan Scam) भामट्यांमी धुमाकूळ घातला आहे. त्यात सायबर भामटे रोज नवनव्या शक्कल लढवत असतात. त्यात आता अनेकांनी गाड्यांवर चलन कापून अनेकांकडून पैसे उकळल्याचे प्रकार समोर येत आहे. लोकांना चलान कापण्याचे मेसेज पाठवत आहेत आणि सापळ्यात अडकलेल्यांना लुटत आहेत. हा घोटाळा वाहनांच्या चालानशी संबंधित असून, त्याबाबत पोलिसांनी अलर्टही जारी केला आहे.
बनावट ई-चलान स्कॅम हा एक नवीन प्रकारचा स्कॅम आहे. स्कॅमर्स लोकांना वाहतूक पोलिसांनी पाठवल्यासारखे मेसेज पाठवत आहेत. या मेसेजमध्ये तुम्ही ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा केला जात असून तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. या मेसेजसोबत एक वेब लिंकही पाठवली जात आहे. लिंकवर क्लिक करून चलानाची रक्कम जमा करा, असे सांगितले जात आहे.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर लोकांना फेक वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं जातं. त्यानंतर पैसे घेतले जात आहेत. याशिवाय अनेकदा युजर्सचे फोनही लिंकच्या माध्यमातून हॅक केले जातात. वैयक्तिक माहिती चोरीला जाते. फसवणुकीचा हा पूर्णपणे नवा फंडा आहे. असे संदेश परिवहन विभागाकडून लोकांना पाठवले जात नाहीत. तुम्हालाही असा मेसेज आला तर तो डिलीट करा.
खऱ्या-खोट्या पावत्या कशा ओळखायच्या?
प्रत्यक्ष चलन संदेशात इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक अशी माहिती असते. मूळ चलनाच्या संदेशासह येणाऱ्या लिंकवर क्लिक केल्यावर ती लिंक वापरकर्त्यांना सरकारच्या अधिकृत साइट https://echallan.parivahan.gov.in रिडायरेक्ट करते. फेक साइटची लिंक अशीच काहीतरी https://echallan.parivahan.in/. .gov.in काढून टाकण्यात आला आहे.
ई-चलान कसं तपासणार?
-हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता.
-यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या ई-चलान वेबसाईटवर जावं लागेल.
-चेक ऑनलाईन सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Check Challan Status वर क्लिक करा.
-त्यानंतर तिथे तुमच्या वाहनाचा नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून ई-चलान एसएमएसद्वारे मिळवण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
-जर तुम्हाला कोणताही चालान मेसेज आला नाही तर DL किंवा Vehicle Number चा पर्याय निवडा.
-तिथे विचारलेली माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा
-तुमच्या वाहनाच्या नावे जर एखादं चालान पेंडिंग असेल तर तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील.
इतर महत्वाची बातमी-